मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई आणि पालघरला मुसळधार पावसाचा फटका बसला. सतत सुरु असलेल्या पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं असून रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही मंदावली. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले असून अनेकजण रस्त्यांवर तसंच रेल्वे स्थानकांवर अडकून पडले आहेत. राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
पावसाने मुंबईची ‘तुंबई’, येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा
येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे
लोकसत्ता ऑनलाइन | Sep 05, 2019 01:40 am

रात्री १०.१५ वाजता रेल्वेची स्थिती -
मध्य रेल्वे - ठाणे ते सीएसएमटीदरम्यान ठप्प
हार्बर - वाशी ते सीएसएमटीदरम्यान ठप्प
पश्चिम रेल्वे - चर्चगेट ते वसईदरम्यान वाहतूक सुुरु
मुंबईमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनची वाहतूक मागील आठ ते नऊ तासांपासून ठप्प आहे. लोकलचा बोजवारा उडल्याने हजारो मुंबईकर रेल्वे स्थानकांवर तसेच कार्यालयांमध्ये अडकून पडले आहेत. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबईमधील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास बंद झालेली वाहतूक रात्री दहा वाजल्यानंतरही सुरु झालेली नाही. त्यामुळेच हजारो कर्मचारी ऑफिसमध्ये अडकून पडले आहेत. तर घरी जाण्यासाठी निघालेले अनेकजण स्थानकांवर अडकून पडले आहेत.
https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-rains-thousands-of-mumbaikar-stranded-in-offices-and-stations-scsg-91-1964464/
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते अंधेरी दरम्यान वाहतूक सुरु झाली आहे. ९ वाजता चर्चगेट ते विरारदम्यान चारही मार्गांवरील वाहतूक सुरु झाली आहे.
मुसळधार पावसामुळे मध्य व पश्चिम रेल्वेच्या सेवा बाधीत झाल्या आहेत. अनेक प्रवासी रेल्वे स्थानकांवर खोळंबले असून जागोजागी अडकून पडले आहेत. मुंबई महापालिकेने रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासोबतच पिण्याचे पाणी तसंच इतर व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व शाळांमध्ये महानगर पालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यरत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
https://www.loksatta.com/mumbai-news/bmc-arrange-shelter-for-stranded-commuters-in-schools-mumbai-rain-sgy-87-1964467/
मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात गेल्या सात ते आठ तासांपासून प्रवासी अडकले आहेत. लहान मुलांच्या खाण्यापिण्याचे हाल होत असून एक प्रवासी बेशुद्ध पडला आहे.
सीएसटीएम स्थानकावर संतप्त प्रवासी रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आहेत
मध्य रेल्वे कधी सुरु होईल सांगू शकत नाही अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
लोअर परळ स्थानकावर रखडलेली धीम्या मार्गावरील लोकल विरारकडे रवाना झाली आहे.
पावसात अडकलेल्यांसाठी सिद्धिविनायक मंदिरात जेवण्याची आणि राहण्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.
मुंबईत ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मुंबईकरांसाठी परळचा राजा नरेपार्क मंडळाकडून जेवणाची सोय करण्यात आली आहे.
सीएसटीएम स्थानकाबाहेर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रेल्वे ठप्प असल्याने रस्त्याने जाण्याचा पर्याय निवडणारे रस्त्यांवरही अडकून पडले आहेत.
दादरवरुन ठाण्यासाठी चालत काही प्रवासी निघाले असून काही रहिवाशांनी त्यांच्यासाठी खाण्याची सोय करण्यात आली आहे.
रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरु असून अंधेरी आणि घाटकोपर स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. अंधेरी स्थानकात रेल्वे रोखण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
चर्चगेटहून वसईला पहिली लोकल रवाना झाली आहे. हळूहळू वाहतूक पुर्वपदावर येत आहे.
मध्य रेल्वे - ठाणे ते सीएसएमटी दरम्यान ठप्पहार्बर - वाशी ते सीएसएमटी दरम्यान ठप्पपश्चिम रेल्वे - चर्चगेट ते अंधेरी दरम्यान धीम्या मार्गावर ठप्प, विशेष फास्ट लोकल धावत आहेत. वसई - विरार लोकल सेवा ठप्प. ट्रान्स हार्बर - उशिराने धावत आहेत
सुमारे दोन तासांनी अंधेरीवरुन चर्चगेटच्या दिशेने लोकल रवाना करण्यात आली आहे
कुर्ला येथील क्रांतीनगरमध्ये एनडीआरएफची टीम दाखल झाली असून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.
सध्या यंत्रणांना दोष देणायऐवजी हवामाना बदलाशी कसा सामना करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे
दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत सकाळी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र, पावसाची तीव्रता वाढल्यामुळे प्रशासनाकडून मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
https://www.loksatta.com/trending-news/lets-know-about-red-orange-and-yellow-alert-nck-90-1964042/
(Photo: Pradeep Pawar)
पावसामुळे अद्याप पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. चर्चगेट ते अंधेरी रेल्वेसेवा पूर्णपणे बंद आहे.
पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्याने माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान लोक ट्रॅकवर उतरुन चालत आहेत. दरम्यान सेवा बंद असल्याची घोषणा स्थानकांवर केली जात आहे.
(Express Photo: Nirmal Harindran)
Western Railways: Due to water logging at Vasai-Virar following trains short terminated and reversed #Maharashtra pic.twitter.com/HLqLJsEzex— ANI (@ANI) September 4, 2019
सतत सुरु असलेल्या पावसामुळे सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर एनडीआरएफची दोन पथकं पुण्याहून पनवेल आणि रायगडसाठी रवाना झाली आहेत
(Express Photo: Nirmal Harindran)
विरार (पूर्व-पश्चिम) व नालासोपारा(पूर्व व पश्चिम) येथील काही फिडरचा वीज पुरवठा पाण्याची पातळी वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे. सध्या आठ फिडर वरील सुमारे ५० हजार ग्राहक दुपारी १२ वाजल्यापासून बाधित आहेत.