02 March 2021

News Flash

२६ जुलैनंतर आजच्या पावसाचा नंबर….

मागच्या ४४ वर्षात दुसऱ्यांदा २४ तासात मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईत मागच्या तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. पण सोमवारी रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. २४ तासात आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ वेधशाळेमध्ये ३७५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ४४ वर्षात दुसऱ्यांदा  २४ तासात मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. २६ जुलै २००५ रोजी मुंबईत सर्वाधिक ९४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी १ हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.

कुलाबा वेधशाळेमध्ये १३७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. डहानूमध्ये १९२.८ मिमी ठाण्यामध्ये मागच्या २४ तासात २२०.४२मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी जुलै १९७४ मध्ये इतकीच ३७५.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. सोमवारी रात्री ११.३० वाजल्यापासून आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४१ मिमी पाऊस कोसळला. त्यामुळे आज सकाळी मुंबईत अनेक भागात पाणी साचले होते. रेल्वे सेवाही ठप्प झाली होती. जुलै महिन्यात एकाच दिवसात गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक पाऊस कोसळला.

ठाण्यातील प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडे मागच्या २४ तासात एकूण ९४ तक्रारी आल्या. त्यात १३ झाडं कोसळल्याच्या आणि तीन फांद्या कोसळल्याच्या होत्या. ठाण्यात ४५ ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 12:30 pm

Web Title: heavy rain mumbai 24 hours in 44 years dmp 82
Next Stories
1 मालाडमधील मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून ५ लाखांची मदत; आदित्य ठाकरेंची घोषणा
2 मुंबई अतिवृष्टी: भाजपा, राष्ट्रवादीचं ट्विटरवॉर; ‘उघडा डोळे, बघा नीट’
3 उद्धव ठाकरेंनाही पावसाचा फटका, ‘मातोश्री’बाहेर साचलं पाणी
Just Now!
X