News Flash

मुसळधार पावसातही मुंबई ठाणे पोलिसांनी तयार केला ग्रीन कॉरिडोअर पण…

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसराला अक्षरश: झोडपून काढले आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

शुक्रवारी 26 जुलै रोजी मुंबईसह आसपासच्या परिसरात पावसाने हाहाकार माजवला होता. अशातच मुंबई आणि ठाणे पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेचं आणि कार्यतत्परतेचं उदाहरणं दाखवून दिलं. जिविता नाडर या साडेतीन वर्षाच्या मुलीला उपचारासाठी डोंबिवलीतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान तिचे फुफ्फुस निकामी झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे डॉक्टरांनी तिला त्वरित मुंबईतील महालक्ष्मी परिसरात असलेल्या बालरूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. तिला तात्काळ हलवणे आवश्यक होते. परंतु मुसळधार पावसामुळे तिला त्या ठिकाणी कसे न्यावे हा प्रश्न तिच्या पालकांसमोर उभा ठाकला होता.

परंतु ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि मुंबई वाहतूक विभागाचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी ग्रीन कॉरिडोअरची तयार दर्शवत त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. मुसळधार पावसातही चिमुरडीचे प्राण वाचवण्यासाठी ठाण्यात उपायुक्त अमित काळे यांनी ग्रीन कॉरिडोअर तयार केला. तर दुसरीकडे हवालदार पारधी यांनी समन्वय साधत त्यांना यासाठी मदत केली. मुंबईतही सहाय्यक आयुक्त विनायक वत्स यांनी ग्रीन कॉरिडोअरसाठी आपले पथक सज्ज केले होते. सर्व यंत्रणा तयार असतानाच एक दुर्देवी घटना घडना घडली. जिविताला रूग्णालयापर्यंत नेण्यापूर्वीच तिची प्रकृती अधिकच ढासळली आणि तिने या जगाचा निरोप घेतला.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसराला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यातच अनेक ठिकाणी पाणी साठण्याचे तसेच मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडीचे प्रकारही घडले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 7:33 pm

Web Title: heavy rain thane and mumbai police green corridor ambulance jud 87
Next Stories
1 रेल्वेतील सर्व प्रवासी सुखरूप; मुख्यमंत्र्यांनी मानले बचाव पथकांचे आभार
2 Mumbai Rain : IMD कडून ‘ऑरेंज अलर्ट’
3 Mumbai Rain : महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची सुटका
Just Now!
X