02 March 2021

News Flash

पुढील दोन तासांत मुंबई जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या २४ तासांमध्ये २०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच अनेक सेवांवरही त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, येत्या दोन तासांमध्ये मुंबई जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच दक्षिण गुजरात आणि आसपासच्या क्षेत्रांमध्येही मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच येत्या काही तासांमध्ये मुंबईत अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. शहरात आतापर्यंत अनेक ठिकाणी २०० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर मुबई उपनगरांमध्ये काही ठिकाणी गेल्या २४ तासांमध्ये २०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

 

वाचा :  https://www.loksatta.com/mumbai-news/school-closed-hospital-railway-staion-water-logged-as-rain-lashes-mumbai-scj-81-1922974/

तसेच मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरही मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी झाली आहे. तर मुंबईतील किंग्ज सर्कल परिसरातही रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.  तसेच रेल्वेसेवाही विस्कळीत झाल्या आहेत. नालासोपारा रेल्वे स्थानकातही पाणी भरल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. तसेच आजच्या दिवसात एसी लोकलची सेवा बंद ठेवण्याचा निर्णयही पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 9:46 am

Web Title: heavy rainfall likely to continue for next two hours mumbai district weather department jud 87
Next Stories
1 मिठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, १००० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं
2 मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय
3 कल्याणमध्ये भिंत कोसळून ३ ठार, १ जखमी
Just Now!
X