News Flash

मुंबईसह राज्यात जोरदार पावसाचा अंदाज

किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी ६५ किलोमीटपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

‘कयार’ चक्रीवादळ कोकणच्या किनारपट्टीजवळ

मुंबई/ पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर ‘कयार’ नावाच्या चक्रीवादळात झाले असून ते राज्याच्या किनारपट्टीपासून १९० किलोमीटरवर आहे. परिणामी, येत्या २४ तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार, तर राज्याच्या उर्वरित भागांतही पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा, मिऱ्या, जयगड बंदरात इतर राज्यांमधील हजारो नौका आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. पूर्व-मध्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आठवडय़ापासून पाऊस सुरू आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी रत्नागिरीपासून १९० किलोमीटर, तर मुंबईपासून ३४० किलोमीटरवर होते. त्यामुळे किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये सोसाटय़ाचा वारा वाहत आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या २४ तासांत कोकण, गोवा, कर्नाटकात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी ६५ किलोमीटपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

चक्रीवादळ ओमानच्या दिशेने

कोकणच्या किनारपट्टीपासून जवळ असलेले ‘कयार’ चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकत आहे. ते येत्या पाच दिवसांत ओमानच्या किनारपट्टीला धडक देईल, असा अंदाज आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रातील त्याचा प्रभाव कमी होईल आणि पावसाचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज आहे.

इशारा..आवाहन

’वाऱ्याचा वेग ताशी ६५ किलोमीटपर्यंत जाण्याचा अंदाज ’मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा ’कोकणात घाट रस्त्यावरून प्रवास टाळण्याचे आवाहन  ’किनारपट्टीवरील पर्यटनास २७ ऑक्टोबपर्यंत मज्जाव

कोकणातील भातशेतीचे  नुकसान 

कोकणातील भातशेतीचे गेल्या  चार-पाच दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.  कापणीस योग्य झालेले पीक वाया गेल्यामुळे  शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 2:21 am

Web Title: heavy rains expected in the maharashtra including mumbai zws 70
Next Stories
1 धोक्याची घंटा
2 वाहनचालकांना वाहतूक पोलिसांची दिवाळी भेट!
3 राजकारणापलीकडचे आम्ही..
Just Now!
X