21 September 2020

News Flash

रेल्वे-बेस्टला फटका

१२ ते १६ तासानंतर वाहतूक पूर्ववत

१२ ते १६ तासानंतर वाहतूक पूर्ववत

मुंबई : बुधवारच्या पावसाने मध्य-पश्चिम रेल्वेबरोबरच बेस्टलाही फटका बसला. मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत होण्यासाठी १२ ते १६ तास लागले. गुरुवारी सकाळी ६.०० वाजता मध्य रेल्वेची मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली, तर हार्बरची वाट सकाळी ८.०० पासून प्रशस्त झाली

रेल्वे थांबल्याने अनेक कर्मचाऱ्यांना बुधवारची रात्र कार्यालय, स्थानकात, पालिके च्या शाळेत बसून काढण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यातच पश्चिम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचेही तीनतेरा वाजल्याने सर्वच मार्ग बंद पडले. साचलेल्या पाण्यामुळे बेस्ट उपक्र माच्या ४३ बसगाडय़ांमध्ये बिघाड झाला. तर गुरूवारी २९ बसगाडय़ांमध्ये बघाड झाला. रुळांवर साचलेल्या पाण्यामुळेही मध्य रेल्वेवरील चार लोकलमध्येही बिघाड झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पावसामुळे लालबाग येथील जय हिंद सिनेमा परिसरात सहा, तर लालबागमधील अन्य परिसरातही चार बसगाडय़ा बंद पडल्या. दादर टीटी येथे चार आणि परळ इंडिया बुल्सजवळही तीन बसेस बंद पडल्याची माहिती बेस्टने दिली. याशिवाय भायखळा स्थानकजवळ, ताडदेवमधील ए.सी. मार्के ट, मुंबई सेन्ट्रल येथील नायर रुग्णालयाजवळ, किं ग्ज सर्कल, वडाळा स्थानक, चेंबूर, वल्र्ड ट्रेड सेंटर कफ परेड, मुंबई सेन्ट्रलमधील अलेक्झांड्रा सिनेमा येथे, आग्रीपाडा, कर्नाक बंदर, काळाचौकी स्थानक, सीएसएमटी, लॅमिंग्टन रोड, हिंदमाता, उरण फाटा, काश्मिरा घोडबंदर रोड येथेही साचलेल्या पाण्यात बस बंद पडल्या.

मध्य रेल्वेवरील मसजिद रोड स्थानक ते भायखळा, परळ, कु र्ला, वडाळा या भागांत रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते वाशी लोकल सायंकाळी चारपासूून बंद ठेवण्यात आल्या. परिणामी चारनंतर घरी परतणाऱ्यांचे हाल झाले. अनेकांना रात्र स्थानकात, कार्यालयात काढण्याशिवाय पर्याय राहिला नाही. पाण्यामुळे एकू ण चार लोकल गाडय़ांमध्ये बिघाड झाला असून त्या दुरुस्त होऊन सेवेत येण्यासाठी तीन दिवस लागण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान रुळ, ओव्हरहेड वायरवर झाडे व त्यांच्या फांद्या पडल्याने आणि रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे या स्थानकादरम्यानची वाहतूक बुधवारी सायंकाळी ५.०० वाजल्यापासून बंद करण्यात आली. तर मुंबई सेन्ट्रल, दादर येथूनच डाऊनला गाडय़ा सोडण्यात येत होत्या. चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान लोकल सुरूच झाल्या नाहीत. गुरुवारी थेट पहाटे ५.०० वाजल्यापासून लोकल धावू लागल्या. परंतु मुंबई सेन्ट्रल ते चर्चगेटपर्यंतचा धिम्या मार्गावर तांत्रिक समस्या येत असल्याने हा मार्ग उपलब्ध करण्यात आला नाही. तर जलद मार्गच लोकल गाडय़ांसाठी उपलब्ध करण्यात आला होता. ओव्हरहेड वायर, सिग्नल बिघाडाने याची कामे के ली जात असून शुक्र वारी सेवा पूर्ववत होईल, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट के ले. मध्य रेल्वेवरही ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते वाशी लोकल सेवा बंदच ठेवण्यात आली होती. मध्य रेल्वेवरील मुख्य मार्ग गुरुवारी सकाळी ६.०० पासून तर हार्बर सकाळी ८.०० पासून सुरू झाली. परंतु भायखळा ते मसजिद रोड, परळ येथील साचलेल्या पाण्यामुळे सिग्नल यंत्रणेला मोठा फटका बसला आहे.

झाडे पडून बेस्टचे नुकसान

अनेक बेस्टच्या गाडय़ांवर झाडे पडून त्यांचे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती बेस्ट उपक्र माकडून मिळाली नाही.

३००.७३ मिमी  नरिमन पॉइंट

३५९.८८ मिमी कुलाबा अग्निशमन दल

३५८.३९ मिमी पालिका मुख्यालय

३२३.८४ मिमी कुलाबा पंपिंग स्टेशन

३४६.६९ मिमी बी विभाग, मशीद बंदर

३०५.३० मिमी मांडवी अग्निशमन दल

३५९.३८ मिमी मेमनवाडा अग्निशमन दल

३५७.६६ मिमी मलबार हिल

३५०.२२ मिमी नायर रुग्णालय

३०२.२४ मिमी ग्रँटरोड पूर्व

३००.४५ मिमी भायखळा अग्निशमन केंद्र

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 2:50 am

Web Title: heavy rains hit best along with the central western railway
Next Stories
1 शार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ
2 पोलीस निरीक्षक आझम पटेल यांचा करोनाने मृत्यू
3 दक्षिण मुंबईत अतिवृष्टी
Just Now!
X