26 February 2021

News Flash

द्रुतगती महामार्गावर गर्दीवेळी अवजड वाहनांना प्रवेश बंदी

विवार तसेच सलग सुट्टया असतील तेव्हा या मार्गावर प्रंचड वाहतूक कोंडी होते.

शनिवार, रविवार आणि लागून येणाऱ्या सुट्टीच्या दिवशी मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या ही प्रवाशांबरोबरच पोलिसांसाठीही मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून गर्दीच्यावेळी अवजड वाहनांना काही काळासाठी खालापूर टोलनाक्यापासून प्रवेश बंदी करण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोडींतून लोकांची सुटका होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाढते अपघात व वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी राज्य रस्ते विकास महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग आणि महामार्ग पोलिसांकडून सुरु आहे. त्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत.

मात्र शनिवार, रविवार तसेच सलग सुट्टया असतील तेव्हा या मार्गावर प्रंचड वाहतूक कोंडी होते. त्यातच अवजड वाहने अनेकदा रस्त्याच्या मधल्या मार्गीकेतूनच जाताना ती बंद पडल्यास तासनतास वाहतूक कोंडी होते. यावर तोडगा काढण्याकरिता आता नव्या पर्यायाची चाचपणी करण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार ‘ हॅपी अवर्स’ योजना राबवण्यात येणार असून प्रायोगिक तत्त्वावरील ही योजना यशस्वी ठरल्यास ती कायमस्वरूपी राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या योजनेअंतर्गत महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होताच ठरावीक कालावधीसाठी याबाबत महामार्ग पोलीस अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. खालापूर टोलनाक्यावर ही वाहने अडवून ठेवण्यात येणार असून रस्ता रिकामी होताच ती पुन्हा सोडली जाणार आहेत.

मात्र त्यासाठी शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवसी प्राधान्याने ही योजना अंमलात आणली जाणार असली तरी महार्गावरील वाहतूक व्यवस्थेची स्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत. पोलिसांच्या या निर्णयामुळे छोटय़ा वाहनाने प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी अवजड वाहने काही काळ थांबवून ठेवल्याने वाहतूक कोंडीची नवीनच समस्या निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. याबाबत महामार्ग पोलीस अधिक्षक समाधान पवार यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 1:02 am

Web Title: heavy vehicles ban at express highway
Next Stories
1 लोकसत्ता वृत्तवेध : गुजरातमध्ये पटेल; तर राज्यात मराठा समाजाची नाराजी
2 नाईक यांच्याप्रमाणे ‘सनातन’चे आठवले यांचीही चौकशी करा
3 ‘नवदुर्गा’चा शोध ..
Just Now!
X