News Flash

भिवंडीत दिवसा अवजड वाहनांना बंदी

भिवंडीकरांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सरसावले आह़े

| September 6, 2014 04:51 am

भिवंडीकरांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सरसावले आह़े भिवंडी शहरातील वाहतुकीत एक महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े  त्यामध्ये अवजड वाहनांना दिवसा शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गे वळविण्यात आली आहे.
भिवंडी शहरात सुमारे ४० ते ४५ हजार गोदामे असून त्या ठिकाणी भारतातील वेगवेगळ्या राज्यांतून वाहने येत असतात. या वाहनांमुळे माणकोली ते अंजूर चौक, काल्हेर ते अंजूर फाटा आणि अंजूर फाटा ते ७२ गाळे या भागांमध्ये मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे भिवंडीकर हैराण झाले आहेत. तसेच नारपोली परिसरात अरुंद रस्ते असून सततच्या वाहतुकीमुळे या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू असते. परिणामी, कल्याण आणि भिवंडीहून ठाणे शहरात रुग्णांना उपचारासाठी घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या वाहतूक कोंडीचा फटका नोकरदार, विद्यार्थी आणि इतर वाहनचालकांना बसतो. तसेच वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो. त्यामुळे जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासाठी एक महिनाच्या प्रायोगिक तत्त्वावर शनिवारपासून हा बदल लागू करण्यात येणार आहे.
 मुख्य मार्गावरील वाहनाने पर्यायी मार्गे वळविण्यात आली असून अहमदाबादमार्गे माणकोली येथे येणारी वाहने मनोर, चिंचोटी फाटामार्गे नारपोली-माणकोली येथे जातील तर नाशिककडून माणकोली येथे येणारी वाहने माणकोली चौकाऐवजी पडघा-बोरिवली-देवली-राहुस-खंबाळा-आंबाडी-चिंचोटी फाटामार्गे जातील, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
*मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली नाका-अंजुर चौक ते कशेळी पूल या मार्गावरील सर्व जड-अवजड वाहनांना रविवारव्यतिरिक्त सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत प्रवेश बंद करण्यात आला आहे.
*नाशिक-रांजनोली नाका तसेच मुंबई-अहमदाबाद-वाडा-वंजारपट्टी-वडपाखिंड-रांजनोली नाका-माणकोली नाकामार्गे येणाऱ्या सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना माणकोली चौकातून उजवीकडे सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत रविवारव्यतिरिक्त प्रवेश बंदी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 4:51 am

Web Title: heavy vehicles banned in bhiwandi at day time
Next Stories
1 सहकाऱ्यांवर हल्ला, नंतर आत्महत्येचा प्रयत्न
2 विकास आराखडय़ाचा खर्च दुपटीहून अधिक
3 मुसळधार पावसाचा इशारा
Just Now!
X