राज्यातील टंचाईग्रस्त भागातील अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीबद्दल हेक्टरी ३ हजार रुपये या प्रमाणे आर्थिक मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मंगळवारी मंत्रालयात दिली.
राज्यातील दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. सध्या ९६९ गावे व ३५६९ वाडय़ांना १३८१ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. राज्यात अपुरा पाऊस पडल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा देण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे, असे कदम यांनी सांगितले.