News Flash

…म्हणून सारा तेंडुलकरने केले नाही मतदान

वांद्र्यामध्ये सचिनने पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसहीत बजावला मतदानाचा हक्क

सारा तेंडुलकर

महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभेसाठी सोमवारी मतदान पार पडले. महाराष्ट्रात सरासरी ६०.४६ टक्के मतदान झाले तर हरियाणामध्ये ६५ टक्के मतदान झाले. काल राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने मतदारांमध्ये निरुत्साह दिसला. मात्र असे असतानाच अनेक सेलिब्रिटीजने घराबाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला. भारतरत्न सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसहीत मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्याने मतदान करण्याचे आवाहनही केले.

दुपारी बाराच्या सुमारास सचिनने वांद्र्यामध्ये मतदान केले. यासंदर्भात त्याने नंतर फेसबुकवर फोटोही पोस्ट केला होता. पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनबरोबरच्या फोटोत सचिन बोटाला लावलेली मतदानाची शाई दाखवता दिसत आहे. “मतदान करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. माझं मत मी नोंदवलं आहे, आपण सर्व सुद्धा मतदान करून या लोकशाहीच्या सोहळ्याचा भाग व्हा,” असा संदेश या फोटोबरोबर सचिनने पोस्ट केला होता.

मात्र सचिनची मुलगी सारा तेंडुलकर मतदानाला आली नाही. सारा कुठे आहे असा सवाल अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर विचारला. सारा परदेशात असल्याने ती मतदानाला येऊ शकली नाही.

१२ ऑक्टोबर १९९७ रोजी जन्म झालेली सारा ही नुकतीच २२ वर्षांची झाली आहे. ती सध्या लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळेच तिला मतदानासाठी मुंबईमध्ये येता आले नाही. म्हणूनच संपूर्ण तेंडुलकर कुटुंबिय मतदानाला गेले असता सारा अनुपस्थित होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 11:03 am

Web Title: here is why sachins daughtersara tendulkar could not vote scsg 91
Next Stories
1 ‘मी तुमची तक्रार करेन’, मतदानानंतर निवडणूक अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन
2 Video: लोकलमध्ये मद्यपान करणाऱ्या दारुड्यांना प्रवाशांनी चोपले
3 शिवसेनेतर्फे १० रुपयांत थाळी, ‘साहेब खाना’ योजना सुरू
Just Now!
X