पुणे येथील घोडेव्यापारी हसन अली याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. परदेशी बँकामध्ये काळा पैसा ठेवल्याचा आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप हसन अलीवर आहे.
न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांच्यासमोर हसन अलीच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने महाधिवक्ता आणि हसन अलीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जामीन अर्ज फेटाळून लावत असल्याचे स्पष्ट केले. मात्र त्याबाबतचा तपशीलवार आदेश १६ सप्टेंबर रोजी देण्यात येईल, असेही नमूद केले. २०११ मध्ये हसन अलीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र विशेष न्यायालयासह उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.