News Flash

पंकज भुजबळ यांना २५ मेपर्यंत अटक न करण्याचे आदेश

पंकज भुजबळ यांना तात्पुरता दिलासा

पंकज भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना २५ मेपर्यंत अटक न करण्याचे आदेश शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे पंकज भुजबळ यांना तात्पुरता दिलासा मिळाला.
पंकज भुजबळ यांच्याविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंटला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी नकार दिला होता. नवीन महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात न्यायालयाने हा निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणात आधी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागायला हवी होती, तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात आलात. आधी उच्च न्यायालयाला या प्रकरणी तपासणी करू द्या, नंतर आम्ही विचार करू. पंकज यांना याचिका मागे घेऊन उच्च न्यायालयात दाद मागण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे पंकज भुजबळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने त्यांना २५ मेपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 5:20 pm

Web Title: high court gives interim relief to pankaj bhujbal
टॅग : Pankaj Bhujbal
Next Stories
1 ‘स्मार्ट सिटी’वर राज्य सरकारचा अंकुश
2 झिंटा विनयभंगप्रकरणी वाडियाचा जबाब नोंदवला
3 राहुल यांच्या नेतृत्वाला पक्षातूनच आव्हान?
Just Now!
X