26 October 2020

News Flash

अर्णब गोस्वामी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

दोन्ही गुन्ह्यांबाबतच्या कारवाईची प्रक्रिया तात्पुरती थांबवली

संग्रहीत छायाचित्र

रिपब्लिक वृत्त वाहिनीचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावरील दोन्ही गुन्ह्यांबाबतच्या कारवाईची प्रक्रिया मंगळवारी तात्पुरती थांबवत उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. पालघर येथील साधुंचा झुंडबळी तसेच वांद्रे स्थानकाबाहेरील स्थलांतरितांची गर्दी याबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते रद्द करण्याच्या मागणीसाठी गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गोस्वामी यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे सकृतदर्शनी दिसून येते, असे नमूद करत न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने कारवाईस स्थगिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 12:32 am

Web Title: high court relief to arnab goswami abn 97
Next Stories
1 ‘कोविड जैववैद्यकीय कचरा विनाप्रक्रिया टाकणे गंभीर’
2 सीमा भागात शासकीय मराठी महाविद्यालय
3 केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मंजुरी
Just Now!
X