22 January 2021

News Flash

मुबईत कडेकोट बंदोबस्त; शांतता राखण्याचे आवाहन

संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरुला फाशी दिल्याची बातमी आज (शनिवार) सकाळी आल्यानंतर मुंबईत तातडीने वरिष्ठ पोलिस अधिका-यांची बैठक झाली. त्यानंतर शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढवण्यात

| February 9, 2013 04:53 am

संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरुला फाशी दिल्याची बातमी आज (शनिवार) सकाळी आल्यानंतर मुंबईत तातडीने वरिष्ठ पोलिस अधिका-यांची बैठक झाली. त्यानंतर शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुस्लिम वस्ती असलेल्या भागात विशेष सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अद्याप कुठलाही अनुसूचित प्रकार घडला नसला तरी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. अफझल गुरूला फाशी दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी शहराच्या विविध भागात आनंद साजरा केला. पोलिसांमध्ये अद्याप कुणाच्याही सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या नाहीत. परंतू सर्व अधिका-यांना आपापल्या विभागात थांबण्यास सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2013 4:53 am

Web Title: high security in mumbai
Next Stories
1 एसटी डबघाईला येण्याची चिन्हे
2 ‘युवराजां’च्या जवळीकीमुळे केंद्रीय राज्यमंत्र्यांना पायघडय़ा!
3 अबू जुंदालवर आरोप निश्चित
Just Now!
X