20 November 2019

News Flash

घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण

हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने अधिक उकाडा

(संग्रहित छायाचित्र)

हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने अधिक उकाडा

कमाल तापमान आणि हवेतील बाष्पामध्ये झालेल्या वाढीमुळे उन्हाच्या झळांसह घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. मागील दोन दिवसांत मुंबईतील काहिली वाढली आहे.

शहरात कमाल तापमानाचा पारा किंचित वाढला तरी असह्य़ उकाडा जाणवत आहे. याचे मुख्य कारण आहे हवेतील वाढलेले बाष्पाचे प्रमाण. गेल्या दोन दिवसांत कमाल तापमान साधारणपणे ३३ अंश से.वर होते आणि बाष्पाचे प्रमाण ६० ते ८० टक्क्यांपर्यंत होते. मात्र शुक्रवारपासून बाष्पाच्या प्रमाणात १० टक्क्यांनी वाढ होऊन ९१ टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. तापमानातील बाष्पाच्या वाढलेल्या प्रमाणामुळे सध्या वास्तविक तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवत आहे. मुंबईसह उपनगरात दोन दिवसांपासून हीच परिस्थिती आहे.  शनिवारी सांताक्रूझ येथे ३४.६ अंश से. आणि कुलाब्यामध्ये ३३.४ अंश से. कमाल तापमान नोंदले. हवेतील बाष्पाच्या प्रमाणाची अनुक्रमे ६८ आणि ९१ टक्के नोंद झाली आहे.

First Published on May 19, 2019 2:11 am

Web Title: high temperature in mumbai
Just Now!
X