05 July 2020

News Flash

शहरात मधुमेह, हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक मृत्यू

२०१७ मध्ये ५ हजार ४४९ लोकांचा मृत्यू क्षयरोगाने झाल्याची नोंद पालिकेकडे आहे

प्रजा फाऊंडेशनचा अहवाल

मुंबई : शहरात क्षयरोगासह मधुमेह, हृदयविकार यांसारख्या असंसर्गजन्य आजाराने होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमध्येही गेल्या दोन वर्षांत वाढ होत असल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे. २०१७ च्या आकडेवारीनुसार शहरात दर दिवशी २६ जणांचा मृत्यू मधुमेहाने, तर एकूण मृत्यूपैकी ९ टक्के मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे नोंदले आहे.

शहरामध्ये नोंदल्या गेलेल्या एकूण मृत्यूंपैकी २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत सर्वाधिक मृत्यू हे मधुमेह आणि हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहेत. तर याच दोन वर्षांमध्ये हृदयविकारांमुळे ७ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५ ते १९ वयोगटातील बालकांचा यात समावेश आहे, तर २० ते ३९ वयोगटातील रुग्णांची संख्याही नोंद घेण्याइतपत आहे. २०१६ आणि २०१७ मध्ये एकूण मृत्यूंपैकी ४ टक्के रुग्णांचा मृत्यू उच्च रक्तदाबाच्या कारणास्तव झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.

२०१७ मध्ये ५ हजार ४४९ लोकांचा मृत्यू क्षयरोगाने झाल्याची नोंद पालिकेकडे आहे. मात्र राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत पालिकेने नोंदविलेल्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये ८०३ जणांचा मृत्यू क्षयरोगाने झाल्याची नोंद आहे. त्यामुळे पालिकेकडून दोन स्वतंत्र यंत्रणांमध्ये वेगवेगळी आकडेवारी कशी नोंदली गेली, असा प्रश्न प्रजाने उपस्थित केला आहे. केंद्र सरकारच्या यंत्रणेमध्ये नोंदविली जाणारी आणि प्रत्यक्ष पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील आकडेवारीमध्ये नेहमीच तफावत असल्याचा आरोप प्रजाने पालिकेवर केला आहे. ही तफावत दूर करण्यासाठी पालिकेने अभ्यास करणे गरजेचे आहे. मृत्यूचे कारण नोंदविण्यासाठीही काही मार्गदर्शक तत्त्वे आखून देणे आवश्यक असून यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे प्रजाचे मिलिंद म्हस्के यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 2:59 am

Web Title: highest death toll from diabetes heart attack in mumbai city zws 70
Next Stories
1 पालिकेची रुग्ण शोध मोहीम ; घरोघरी जाऊन ४० लाख व्यक्तींची तपासणी करणार
2 याचिकेत खोटी माहिती देणे महागात
3 मध्य रेल्वेत प्रथमच बॉम्बशोधक पथक
Just Now!
X