News Flash

जुलै महिन्यात मुंबईत रेकॉर्डब्रेक पाऊस

1959 नंतर 2014 साली मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती.

प्रातिनिधीक छायाचित्र

जुलै महिन्याच्या सुरूवातील विश्रांती घेतलेल्या पावसाने महिन्याच्या मध्यानंतर मुंबई आणि उपनगर, तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. 2014 नंतर यावर्षी जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. यापूर्वी 1959 साली जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला होता.

यावर्षी जुलै महिन्यात कुलाब्यात सरासरी 1175.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर सांताक्रुझ परिसरात जुलै महिन्यात सरासरी 1464.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 2014 साली सरासरी 1468.5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. 1959 नंतर राज्यात 2014 साली राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी जास्त पावसाची नोंद झाली, असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे उप महासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली.

दरम्यान, आतापर्यंत कोलाबा परिसरात 1516.2 मिलीमीटर, तर सांताक्रुझ परिसरात 1979.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे होसाळीकर यांनी नमूद केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी काही धरणेही पूर्णपणे भरली आहेत. तसेच येत्या काळात महाराष्ट्रातील अन्य भागांमध्येही दिलासादायक पर्जन्यमान राहणार असल्याची अपेक्षा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 6:00 pm

Web Title: highest rainfall in mumbai july 2019 weather departmet jud 87
Next Stories
1 मुंबई – माटुंग्यात रस्त्यात बसने अचानक घेतला पेट
2 पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे राजीनामा दिला – चित्रा वाघ
3 धाक दाखवून भाजपात प्रवेश दिले नाहीत-मुख्यमंत्री
Just Now!
X