15 December 2017

News Flash

ध्वनीप्रदूषणाच्या विळख्यात रुग्ण

रुग्णांची प्रकृतीसाठी हा आवाज धोक्याचा ठरू शकतो असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

प्रतिनिधी, मुंबई | Updated: May 20, 2017 2:40 AM

हिंदूजा व केईएम रुग्णालय परिसरात सर्वाधिक ध्वनीप्रदूषण

रुग्णालय परिसर हा शांतता क्षेत्र असतानाही मुंबई आणि उपनगरातील रुग्णालय परिसरात ध्वनीप्रदुषणाची पातळी उंचावत आहे. यामध्ये हिंदूजा रुग्णालयाच्या परिसरात १००.५ डेसिबल आणि केईएम रुग्णालय परिसरात १००.३ डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे. रुग्णांची प्रकृतीसाठी हा आवाज धोक्याचा ठरू शकतो असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

आवाज फांऊडेशन केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली असून अधिकतर आवाज हा वाहनांच्या हॉर्नमुळे येत असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले आहे. या सर्वेक्षणात आवाज फांऊडेशनने लंडन आणि मुंबईतील रुग्णालय परिसरातील आवाजाची तुलना केली आहे. रुग्णालयाचा परिसरात हा शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. रुग्णांना तब्येत सुधारण्यासाठी शांततेची आणि आराम करण्याची गरज असते. त्यासाठी शांतात आवश्यक असते. त्याशिवाय कर्कश आवाजामुळे मनोरुग्णांची मनस्थिती बिघडू शकते. मात्र आवाज फांऊडेशनच्या तपासणीत मुंबईतील रुग्णालय परिसरातील प्रदुषणाची पातळी उच्च असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आवाज रस्त्यावरील वाहने आणि सातत्याने वाजणारे हॉर्न यामुळे वाढत असल्याचेही आवाज फांऊडेशनकडून सांगण्यात आले. तर मुंबईतील रुग्णवाहिकेवरील लाल दिव्याचा आवाज  नोंद ही १०० डेसिबलपर्यंत करण्यात आली आहे.   चांगल्या प्रकृतीसाठी शांतता आवश्यक असते. जास्त डेसिबलच्या आवाजात फार वेळ  काम केल्याने मानसिक त्रास होऊ शकतो, असे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. भुमकर यांनी सांगितले.

First Published on May 20, 2017 2:40 am

Web Title: highest sound pollution near hinduja kem hospital area