19 January 2019

News Flash

चंद्रपूरमध्ये देशातील सर्वाधिक तापमान

मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा शिडकावा होत असतानाच विदर्भात पुन्हा एकदा तापमानाने उसळी घेतली आहे.

मुंबईत आज तापमान ३८ अंश से.

मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा शिडकावा होत असतानाच विदर्भात पुन्हा एकदा तापमानाने उसळी घेतली आहे. सोमवारी चंद्रपूर येथे नोंदले गेलेले ४३.७ अंश से. हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले. मुंबईत मंगळवारी शहरातील हवा ३८ अंश से.पर्यंत तापणार असल्याचा अंदाज आहे.

विदर्भातील बहुतांश ठिकाणी दिवसाच्या तापमानात वाढ झाली. चंद्रपूर येथील कमाल तापमान ४३.७ अंश से.पर्यंत वाढले. पुणे (३९.२ अंश से.), नाशिक (३८.५), औरंगाबाद (४०.२) आणि नागपूर (४२) येथील हवाही चांगलीच तापली. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवर बाष्पाचे प्रमाण अधिक असल्याने दिवसाचे तापमान ३५ अंश से.च्या मर्यादेत राहिले. मात्र मंगळवारी तापमानही वाढणार असल्याची शक्यता असून मुंबईतील तापमान ३८ अंश से.पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

First Published on April 17, 2018 5:24 am

Web Title: highest temperature in chandrapur