मुंबई : जुलै महिन्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाल तापमानाची विक्रमी नोंद शुक्रवारी झाली. वेधशाळेच्या सांताक्रुझ केंद्रामध्ये शुक्रवारी कमाल तापमानाची ३६.२ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. यापूर्वी २२ जुलै १९६० रोजी ३४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. जुलै महिन्यातील ही विक्रमी नोंद मानली जात होती. मात्र कमाल तापमानाचा हा विक्रम शुक्रवार, १९ जुलै २०१९ रोजी मोडीत निघाला. जुलैच्या सुरुवातीला कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दडी मारल्यामुळे मुंबईकरांना दिलासा देणारा गारवा हरपला असून मुंबईकर उकाडय़ाने हैराण होऊ लागले आहेत. जुलै महिन्यातील कमाल तापमानाने शुक्रवारी विक्रम नोंदवला. वेधशाळेच्या सांताक्रुझ केंद्रामध्ये शुक्रवारी ३६.२ अंश सेल्सिअस इतकी कमाल तापमानाची नोंद झाली. त्यात सरासरी सहा अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.