उच्चशिक्षित तरुणास सुरतमधून अटक

मुंबई : कर्ज फे डण्यासाठी ई-कॉमर्स संके तस्थळाच्या आधारे देशभरातील २२ हजार महिलांची एक कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या उच्च शिक्षित, संगणक तज्ञ तरुणास सायबर पोलिसांनी सुरतमधून अटक केलाी. मुंबईत घरकाम करून कु टुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या महिलेने दिलेल्या तक्रोरीमुळे पोलीस इतक्या मोठय़ा प्रमाणात फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्या आरोपपर्यंत पोहचू शकले. अशा प्रकारची अन्य ११ फसवणूक करणारी संकेतस्थळेही सायबर पोलिसांना सापडली आहेत.

आशिष अहिर (३२) असे या तरुणाचे नाव असून त्याने ब्रिटनमधील नामांकित विद्यापीठातून माहिती तंत्रज्ञानविषयक पदव्युत्तर अभ्यास पूर्ण के ला आहे. शिक्षण पूर्ण करून त्याने गुजरातमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू केला. सर्व काही सुरळीत सुरू असताना चलनबंदी आणि वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) व्यवसायातील गणित चुकले. त्यातून सावरण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र गेल्या वर्षी मार्चपासून लागू झालेल्या टाळेबंदीमुळे तो अयशस्वी ठरला. कर्जदारांचा तगादा सुरू झाल्याने आहिरने ‘शॉपी डॉट कॉम’ या नावाचे ई-कॉमर्स संके तस्थळ सुरू के ले. या संकेतस्थळावर महिलांचे कपडे, पादत्राणे, गृहोपयोगी वस्तू, इमिटेशन ज्वेलरी आदींची छायाचित्रे आणि ८० टक्क्यांपर्यंत सवलतीचे प्रलोभन असलेल्या ‘शॉपी डॉट कॉम’च्या जाहिराती समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या होत्या.

आशिषच्या संके तस्थळावर ‘कॅ श ऑन डिलेव्हरी’ म्हणजे वस्तू घरी आल्यावर पैसे चुकते करण्याचा पर्याय नव्हता. मात्र आकर्षक जाहिरातीमुळे ग्राहकांनी त्याकडे दुर्लक्ष के ले आणि ऑनलाईन पैसे दिले. मात्र ऑर्डर केलेल्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बहुतांश ग्राहकांनी संके तस्थळावर तशी प्रतिक्रियाही नोंदवली. फसवणूक झालेल्या २२ हजार ग्राहकांमध्ये बहुतांश महिला आहेत. पाचशे ते तीन हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार असल्याने ग्राहकांनी फसवणुकीकडेही दुर्लक्ष के ले. त्यामुळे आशिष अधिकाधिक ग्राहकांना फसवू शकला, असे या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले.

मात्र मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलेने ‘शॉपी डॉट कॉम’वरून मागवलेली सुमारे तीन हजार रुपयांची वस्तू न आल्याने आपल्या मालकीणीला सांगितले. मालकीणीने तिला सायबर पोलीस ठाण्यास तक्रोर देण्यास सांगितले. तक्रोर प्राप्त होताच सायबर पोलीस ठाण्याच्या प्तपास के ला असता असंख्य महिलांच्या तक्रोरी आढळल्या. तांत्रिक तपासाआधारे हे पथक आरोपी आशिषपर्यंत पोहोचलेच पण या संके तस्थळाला किती ग्राहकांनी भेट दिली, किती ग्राहकांनी खरेदी के ली याचीही माहिती मिळवली. त्याआधारे आशिषने गेल्या चार महिन्यात सुमारे २२ हजार ग्राहकांना एक कोटींहून जास्त रक्कमेस फसविल्याचे स्पष्ट झाले.

बनावट संकेतस्थळे

या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलीस पथकाला व्हाईट-स्टोन्स डॉट इन, जॉलीफॅ शन डॉट इन, फॅ ब्रीकमॅनीया डॉट कॉम, टेकसारी डॉट कॉम, अशुअर्डकार्ट डॉट इन, रिपब्लिकसेल्स ऑफर्स डॉट मायशॉपीफाय डॉट कॉम, फॅ ब्रीकव्हाईब्स डॉट कॉम, ईफायनान्सटीक्स डॉट कॉम, दीफॅब्रीक्सहोम डॉट कॉम, थर्मोक्लासिक आणि कस्मीरा डॉट इन या ११ फसव्या संके तस्थळांची माहिती मिळाली. या सर्व संके तस्थळांवर ग्राहकांनी अशाच पद्धतीने फसवणुकीच्या तक्रोरी  केल्या आहेत.

आवाहन

ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी ‘कॅ श ऑन डिलीव्हरी’ हा पर्याय निवडावा, सुरक्षित माध्यमांद्वारे (गेटवे) व्यवहार करावे, मोठया प्रमाणात सूट, सवलतीचे आमीष दाखविणाऱ्या संके तस्थळांबाबत खबरदारी बाळगावी, ग्राहकांच्या प्रतिक्रि या पाहून व्यवहार करावे, असे आवाहन सायबर विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी नागरिकांना केले.