हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येच्या बातमीने मला जबर धक्का बसला आहे. हे पूर्णपणे अनपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी दिली. हिमांशू रॉय एक हुशार, सुसंस्कृत अधिकारी होते. स्वत:च्या फिटनेसबद्दल ते अतिशय दक्ष असायचे. त्यांनी त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावाने गुन्ह्यांची वेगवेगळी प्रकरणे हाताळली असे पटनायक यांनी सांगितले.

मागच्या तीन वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. त्यांचे कर्करोगाचे निदान फार उशिराने झाले. तो पर्यंत कर्करोग त्यांच्या हाडांपर्यंत पसरला होता. त्या परिस्थितीतही ते कामावर यायचे. आजार वाढल्यानंतर मागच्या दोन वर्षांपासून ते सुट्टीवर होते. मी त्यांच्या संपर्कात होतो. कर्करोगामुळे त्यांना प्रचंड वेदना होत होत्या. हा त्रास सहन करण्यापलीकडे असल्याचे त्यांनी म्हटले होते.  तीन महिन्यांपूर्वी त्यांनी माझ्याबरोबर तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेण्याबाबत चर्चा केली होती.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

मी त्यांना एका डॉक्टरचे नाव सुचवले होते. वेगवेगळया चाचण्या केल्यानंतर कर्करोग मेंदूपर्यंत पसरल्याचे स्पष्ट झाले. शस्त्रक्रियेचा एक पर्याय त्यांच्यासमोर होता. पण त्यातून फार काही सुधारणा होणार नाही हे रॉय यांना कळून चुकले असावे. त्यामुळेच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे असे पटनायक म्हणाले. हा अनैसर्गिक मृत्यू असल्यामुळे पोलीस तपास होईलच त्यातून सत्य काय ते समोर येईल असे पटनायक यांनी सांगितले.