झेड दर्जाची सुरक्षा ही अतिमहत्वाच्या व्यक्तिंना दिली जाते. ज्या व्यक्तिंच्या जीवाला दहशतवादी, गँगस्टर यांच्यापासून धोका आहे अशा अतिमहत्वाच्या व्यक्तिंना झेड दर्जाची सुरक्षा दिली जाते. २०१४ साली मुंबईच तत्कालिन पोलीस आयुक्त राकेश मारीया यांच्यासह हिमांशू रॉय यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली.

झेड प्लस दर्जाची सुरक्षा मिळालेले ते मुंबई पोलीस दलातील पहिले अधिकारी होते. हिमांशू रॉय यांनी दहशतवादापासून ते खूनाच्या गंभीर गुन्ह्याची संवेदनशील प्रकरणे हाताळली होती तसेच रॉय त्यावेळी एटीएसचे प्रमुख होते. त्यामुळे सुरक्षेचा आढावा घेताना रॉय यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली.

मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून रॉय यांची कारर्किद अत्यंत यशस्वी ठरली होती. त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली होती. त्यामुळेच सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या विशेष समितीने हिमांशू रॉय यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली.

काय असते झेड प्लस सिक्युरिटी
राज्यांचे मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कॅबिनेट मंत्र्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाते. झेड प्लस टीममध्ये ३६ पोलिसांचा समावेश होतो. कार्यालय, घर अशा ठिकाणी या पोलिसांची तैनाती केली जाते. सतत २४ तास हे पोलीस सुरक्षेसाठी सोबत असतात. झेड प्लस सुरक्षा असणाऱ्यांना बुलेटप्रूफ गाडी दिली जाते.