05 June 2020

News Flash

Coronavirus : ‘हिंदुजा’त नवे रुग्ण दाखल करणे बंद

रुग्णालयातील करोनाबाधित रुग्ण सेव्हन हिल्समध्ये दाखल

रुग्णालयातील करोनाबाधित रुग्ण सेव्हन हिल्समध्ये दाखल

मुंबई : खार येथील हिंदुजा रुग्णालयात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णाला बुधवारी सेव्हन हिल्समध्ये दाखल केले आहे. या घटनेनंतर रुग्णालय प्रतिबंधित केले असून नवीन रुग्ण दाखल करून घेणे बुधवारपासून बंद केले आहे.

पाली हिल नाका भागातील ७६ वर्षीय महिला आकडी येत असल्याने ६ एप्रिलला हिंदुजा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल झाली होती. रुग्णालयाच्या नियमावलीनुसार तिला तपासणीनंतर थेट विलगीकरण कक्षात नेले गेले. त्यानंतर चाचणी करण्यासाठी पाठवले. याचा अहवाल बुधवारी आला असून तिला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील उपचारांसाठी रुग्णाला सेव्हन हिल्स येथील करोना रुग्णालयात पाठविले आहे.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्णालयाने अतिदक्षता विभागासह नवे रुग्ण दाखल करून घेण्याची सेवा बंद केली आहे. रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग २१ मार्चपासूनच बंद केलेला होता. रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्यांना तपासण्या करून रुग्णालयातच वेगळ्या मजल्यावर ठेवण्यात आले असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.

रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना बुधवारी रुग्णालयातच थांबण्यास सांगितले असून त्यांच्या चाचण्या केल्या जातील. महिलेच्या थेट संपर्कात आलेल्या तिच्या कुटुंबातील १४ जणांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे वॉर्ड अधिकारी विनायक विसपुते यांनी सांगितले.

हिंदुजा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह रुग्णालयात दाखल असलेल्या ३१ जणांच्या चाचण्या के ल्या असून यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत, असे रुग्णालयाने सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 1:17 am

Web Title: hinduja hospital stopped taking new coronavirus patients zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 यंदा पावसाळ्यात लोकल वेळापत्रक विस्कळीतच?
2 पशुखाद्य, औषधांच्या तुटवडय़ामुळे पाळीव प्राण्यांचे हाल
3 Coronavirus : ..आणि माणुसकीने मान टाकली
Just Now!
X