News Flash

हिरामणी तिवारींना मारहाण आणि मुंडण प्रकरणी चार शिवसैनिकांना अटक

मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे

हिरामणी तिवारींना मारहाण आणि मुंडण प्रकरणी चार शिवसैनिकांना अटक
फोटो-ANI

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या हिरामणी तिवारी यांना मारहाण करणं, त्यांचं मुंडण करणं हे शिवसैनिकांना भोवलं आहे. कारण याप्रकरणी चार शिवसैनिकांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. समाधान जुगधर, प्रकाश हसबे, श्रीकांत यादव आणि सत्यवान कोळंबेकर अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावं आहेत. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

काय आहे हे प्रकरण?
दोन दिवसांपूर्वी हिरामणी तिवारी यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. जामिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली त्याची तुलना उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बाग घटनेसोबत केली होती. यावरुन हिरामणी तिवारी यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट केल्याचं समजतात हिरामण तिवारी यांना गाठून शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली. तसंच त्यांचं मुंडणही केलं.

काय आहेत अटक केलेल्यांची नावं?

१) समाधान जुगधर

२) प्रकाश हसबे

३) श्रीकांत यादव

४) सत्यवान कोळंबेकर

 

किरिट सोमय्या आक्रमक

या प्रकरणावरुन भाजपाचे नेते किरीट सोमय्या शिवसेनेविरोधात आक्रमक झाले. त्यांनी शिवसेनेच्या २२ कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी एकूण चार शिवसैनिकांना अटक केली. यासंदर्भातले ट्विटही किरीट सोमय्या यांनीच केले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2019 9:26 pm

Web Title: hiramani tiwari tonsuring case police arrested 4 shivsena activist scj 81
Next Stories
1 भाजपा आमदार आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
2 #CAA: भाजपाकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर
3 मुंबई : ‘सीएए’विरोधात वंचित बहुजन आघाडीचं धरणं आंदोलन
Just Now!
X