अनेक जणांना वाटतं मलबारी चाचे इंग्रजांची जहाजं लुटायला आले आणि त्यांच्यामुळे या भागाला मलबार हिल नाव पडलं. पण तसं नाहीये. इंग्रज पश्चिम किनारपट्टीलाच सरसकट मलबार संबोधत असत. त्यातूनच जशा घटना घडत गेल्या त्यानुसार या विशिष्ट भागाचं नाव मलबाल हिल पडलं. उच्चभ्रू लोकांची वस्ती होण्याआधी, मुंबईतल्या इंग्रज अधिकाऱ्यांसाठी शिकार करण्यायोग्य जंगल अशी ओळख असलेल्या मलबार हिलला स्वत:चा इतिहास आहे.
वाळकेश्वर व बाणगंगेचं ऐतिहासिक महात्म्य, साधुंच्या समाध्या असलेले आखाडे, धोबीघाट, प्राचीन वैभवाच्या खुणा आजही जोपासणारी मंदिरं असं बरंच काही इथं अजूनतरी शिल्लक आहे. मलबार हिलचा हा इतिहास पुढील काही भागांमध्ये उलगडणारेत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 9:00 am