|| प्रसाद रावकर

पालिकेची दादर, माहीम, धारावीत प्रायोगिक तत्त्वावर योजना

how eating onions included food in summer helps to beat the heatwaves
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केलेली असतानाही किराणा साहित्य खरेदी करण्याच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या मंडळींना रोखण्याकरिता आता दादर, माहीम, धारावी भागांत प्रायोगिक तत्त्वावर झोमॅटोच्या माध्यमातून रहिवाशांना किराणा साहित्य घरपोच देण्याची शक्कल पालिकेने लढविली आहे.

राज्यात टाळेबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यात आली  आहेत. त्यामुळे आता नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडू लागले आहेत. किराणा मालाच्या दुकानात प्रचंड गर्दी करीत आहेत. भाजी खरेदीसाठी बाजारपेठांमध्येही झुंबड उडत आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने आता नवी शक्कल लढविली आहे. दादर, माहीम आणि धारावी परिसरामध्ये प्रायोगिक तत्वावर झोमॅटोच्या माध्यमातून रहिवाशांच्या घरी किराणा साहित्य पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी या परिसरातील किराणा मालाची दुकाने आणि झोमॅटो यांच्यामध्ये करार करण्याचे प्रयत्न पालिकेने सुरू केले आहेत. या परिसरातील किराणा मालाच्या दुकानांची यादी बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही अधिकारी दुकानदारांबरोबर चर्चा करीत असून किराणा साहित्य रहिवाशांच्या घरी पोहोचते करण्यासाठी दुकानदार आणि झोमॅटो यांच्यामध्ये करार करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये उभयतांमध्ये करार झाल्यानंतर ही सेवा कार्यान्वित करण्यात येईल. एकदा का ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाइलवरील अ‍ॅपद्वारे झोमॅटोला हव्या त्या किराणा साहित्याची यादी पाठविल्यानंतर काही वेळातच ते घरपोच होऊ शकेल. त्यामुळे किराणा दुकानांमध्ये होणारी गर्दी टाळणे शक्य होईल आणि करोनाचा संसर्ग वाढण्याची भीतीही दूर होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.