News Flash

करोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का…; गृहमंत्र्यांकडून आठवलेंना त्यांच्याच शैलीत सदिच्छा

आठवलेंना झाली आहे करोनाची लागण

रिपाईंचे नेते रामदास आठवले यांना करोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांना करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दरम्यान, अनेकांनी ते लवकरच यातून बरे व्हावे यासाठी प्रार्थना आणि सदिच्छा दिल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील रामदास आठवले यांच्याच स्टाईलमध्ये त्यांना यातून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या.

“करोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा; धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, करोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का. रामदास आठवले लवकर बरे व्हा,” असं म्हणत अनिल देशमुख यांनी आठवले यांच्याच शैलीत त्यांना सदिच्छा दिल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना सदिच्छा दिल्या.

रामदास आठवले यांना करोनाची लागण झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आपल्या संपर्कात जे लोक आले आहेत त्यांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. करोनाची साथ नव्यानेच आली होती तेव्हा गो करोना करोना गो अशी घोषणा दिल्याने रामदास आठवले हे चांगलेच चर्चेत आले होते. मुंबईतील नरीमन पॉईंट या ठिकाणी त्यांनी या घोषणा त्यावेळी दिल्या होत्या. आता रामदास आठवलेंना करोनाने गाठलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ते खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

रामदास आठवले यांना करोनाची लक्षणे नाहीत. कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी काळजी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार मुंबईत एका खासगी रुग्णालयात चार दिवसांसाठी दाखल होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे आणि शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे रिपाइंच्या वतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. ‘गो करोना चा’ प्रसिध्द नारा देणारे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले हे झुंझार लढाऊ संघर्ष नायक आहेत. ते करोनावर मात करून नक्की बरे होतील अशी प्रार्थना चाहत्यांची असून ना रामदास आठवले यांच्या पाठीशी पुण्यबळ आहेत. गरिबांचे आशीर्वाद त्यांचे रक्षण करतील. ते करोनावर मात करून पुन्हा गोरगरिबांच्या बहुजनांच्या देशाच्या सेवेत हसतमुखाने हजर राहतील अशी प्रार्थना लाखो चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 4:34 pm

Web Title: home minister anil deshmukh wishesh rpi ramdas athavle healthy life coronavirus in his style jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अंबानी बंधूंची Z+ सुरक्षा रद्द करा, स्वत:ची सुरक्षा व्यवस्था करु शकतात इतके श्रीमंत आहेत; सुप्रीम कोर्ट म्हणतं…
2 सासूने सुनेला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं आणि त्यानंतर…
3 … आता यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील असं वाटतंय; नितेश राणेंचा टोला
Just Now!
X