03 August 2020

News Flash

VIDEO : आजही अपत्यप्राप्तीसाठी गोऱ्या देवाला दिला जातो बळी

आज या जागी पुतळा नाहीये, साधा चौथरा आहे पण त्यालाच नवस बोलण्याची व फेडण्याची परंपरा आजही सुरू आहे.

फोर्टमधील हॉर्निमन सर्कलमध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसचा संगमरवरी पुतळा होता. भारतीयांना देवांच्या मूर्ती बघायची सवय होती त्यामुळे जवळच असलेल्या मुंबई बंदरातील कुलींना वाटलं हा गोरा देव आहे. बघता बघता हा देव पुजला जाऊ लागला, त्याला नवस बोलले जाऊ लागले. कालांतरानं अशी अंधश्रद्धा पसरली की गोऱ्या देवाला नवस बोलला की अपत्य नसलेल्या जोडप्यांना मूलं होतात. मग नवस बोलण्याची प्रथा रूढ झाली, कोंबड्यांचा बळी देण्याचेही नवस बोलले जाऊ लागले.

आज या जागी पुतळा नाहीये, साधा चौथरा आहे पण त्यालाच नवस बोलण्याची व फेडण्याची परंपरा आजही सुरू आहे.

हा व्हिडीओ नी गोष्ट मुंबईची ही व्हिडीओ सीरिज कशी वाटली हे यु ट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…

गोष्ट मुंबईची या सिरिजचे आणखी भाग पाहा

VIDEO : शिवाजी महाराज होते म्हणून घडली आधुनिक मुंबई

VIDEO : मुंबईचं मूळ स्थान कोणतं? ताजमहलपेक्षाही जुनी वास्तू आजही आहे दिमाखात उभी

VIDEO : मुंबईचा पहिला मर्चंट प्रिन्स होता मराठी माणूस

VIDEO : हे आहे मुंबईतलं मिनी लंडन

VIDEO : आशिया खंडातील पहिलं स्टॉक मार्केट सुरू झालं या वटवृक्षांच्या छायेत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2020 8:57 am

Web Title: hornimal circle gora dev fort know all details nck 90
Next Stories
1 मुलुंड येथे वृद्धाची हत्या
2 अहमदाबादमध्ये ‘नमस्ते’ आणि दिल्लीत आगडोंब!, शिवसेनेची सरकारवर टीका
3 ‘झोपु’तील घर विक्रीची अट शिथिल
Just Now!
X