News Flash

‘रुग्णाची बेकायदा अडवणूक हा गुन्हाच’

उपचार खर्चाचे देयक भरले नाही म्हणून रुग्णाला बेकायदेशीररीत्या रुग्णालयातच अडकवून ठेवणे हा एकप्रकारे गुन्हाच आहे.

उपचार खर्चाचे देयक भरले नाही म्हणून रुग्णाला बेकायदेशीररीत्या रुग्णालयातच अडकवून ठेवणे हा एकप्रकारे गुन्हाच आहे. त्यामुळे सरकारने त्याबाबत कायदा करण्याची गरज असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. या समस्येवर तातडीने उपाय करण्याची गरज असल्याचेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

उपचार खर्चाचे देयक भरले नाही म्हणून सेव्हन हिल्स या सप्ततारांकित रुग्णालयाने रुग्णाला बेकायदेशीरीरित्या रुग्णालयातच अडकवून ठेवले होते. त्या विरोधात या रुग्णालयाच्या भावाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर रुग्णालयाने माघार घेत रुग्णाची रुग्णालयातून सुटका केली होती. परंतु हा एकच प्रकार नसून बऱ्याच रुग्णालयांमध्ये याचा कित्ता गिरवला जात असल्याचा दावा करणारी जनहित याचिका न्यायालयात करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 12:02 am

Web Title: hospital problem
Next Stories
1 PANAMA PAPERS : माझा कोणत्याही परदेशी कंपनीशी संबंध नाही- अमिताभ बच्चन
2 प्रत्युषाच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
3 शांतता क्षेत्र असताना मनसेच्या मेळाव्याला परवानगी कशी? हायकोर्टाचा सवाल
Just Now!
X