21 October 2020

News Flash

रुग्णालये दुकाने झाली आहेत! ; उच्च न्यायालयाची डॉक्टरांना चपराक

सध्या रुग्णालये जणू दुकानांसारखी चालविली जात आहेत. डॉक्टरांना आपल्या कर्तव्याचा विसर पडल्यानेच ती दुकानांसारखी चालविली जात आहेत. या क्षेत्राचे व्यापारीकरण केले जात आहे.

| June 14, 2014 12:06 pm

सध्या रुग्णालये जणू दुकानांसारखी चालविली जात आहेत. डॉक्टरांना आपल्या कर्तव्याचा विसर पडल्यानेच ती दुकानांसारखी चालविली जात आहेत. या क्षेत्राचे व्यापारीकरण केले जात आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी रुग्णाच्या आरोग्यापेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा बनला आहे, असे खडे बोल शुक्रवारी न्यायालयाने सुनावले.
उपचाराच्या खर्चाची रक्कम जमा केली नाही म्हणून भावाला घरी पाठविण्यास मज्जाव करण्याच्या सप्ततारांकित ‘सेव्हन हिल्स’ रुग्णालयाविरोधात संजय प्रजापती यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळेस याचिकेची दखल घेत न्यायालयाने वैद्यकीय क्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीबाबत टीका केली. उपचाराच्या खर्चाची रक्कम जमा केली नाही म्हणून रुग्णाला बंदिस्त ठेवणे हे अमानवीय असल्याचेही न्यायालयाने सुनावले.रुग्णालय प्रशासनाने याचिकेतील आरोपांचे खंडन केले व प्रजापती यांच्या भावाला घरी पाठविण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली. गेल्या महिन्यात त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतरच त्याला घरी पाठविण्यात येणार होते. परंतु निरीक्षणासाठी त्याला रुग्णालयात ठेवण्यात आल्याचा दावाही रुग्णालयाने केला.
दरम्यान, अशाप्रकारे रुग्णाला बंदिस्त करण्याबाबत रुग्णालयांना अधिकार देणारी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत का, अशी विचारणा करीत हा मुद्दा गंभीर असून न्यायालयाने भारतीय तसेच राज्य वैद्यकीय परिषदेला याप्रकरणी प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 12:06 pm

Web Title: hospitals are being run like shops hc
Next Stories
1 शर्तीभंगाची तलवार दूर!
2 कॅम्पाकोला प्रकरणी राज्य सरकार अ‍ॅटर्नी जनरलचे मत आजमावणार
3 हंडोरेंच्या शाळेशेजारी असलेल्या भूखंडाबाबत पालिका उदासीन
Just Now!
X