28 November 2020

News Flash

सेवा कराविरोधात देशभरातील हॉटेल सोमवारी बंद

देशातील वातानुकूलित आणि अर्ध वातानुकूलित हॉटेल्सवर लावलेल्या सेवाकराच्या निषेधार्थ हॉटेल व्यावसायिकांच्या ‘आहार’ संघटनेने सोमवारी, २९ एप्रिल रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे.

| April 27, 2013 05:24 am

देशातील वातानुकूलित आणि अर्ध वातानुकूलित हॉटेल्सवर लावलेल्या सेवाकराच्या निषेधार्थ हॉटेल व्यावसायिकांच्या ‘आहार’ संघटनेने सोमवारी, २९ एप्रिल रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला राज्यातील आणि गुजरातमधील हॉटेल्स असोसिएशननेही पाठींबा दिला असून राज्यातील २७ हजार हॉटेल्स बंद राहणार आहेत.
‘इंडियन हॉटेल्स अ‍ॅण्ड रेस्टॉरन्टस असोसिएशन’ (आहार) संघटनेने शुक्रवारी एका पत्रकार परिषदेमध्ये या बंदची माहिती दिली. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये वातानुकूलित हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या बिलावर आणखी १२.६३ टक्के इतका सेवा कर लावण्याच्या घोषणेची अंमलबजावणी १ एप्रिलपासून सुरू झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची संख्या घटून व्यवसायावर परिणाम झाल्याचे हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 5:24 am

Web Title: hotel closed on monday against service tax
Next Stories
1 हॉटेल-रेस्टॉरंटसाठी स्वतंत्र नियम करा!
2 सरकारचा ‘डोस’ कामी आला!
3 क्लासच्या आव्हानाला तोंड देणे जिकिरीचे – भाग ७
Just Now!
X