News Flash

मुंबईत भरधाव कार बसवर आदळून भीषण अपघात, हॉटेल व्यवसायिकाच्या १८ वर्षीय मुलाचा मृत्यू

मरिन ड्राइव्हमध्ये हा अपघात झाला

भरधाव वेगात जाणारी कार बसवर आदळून मुंबईत १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मरिन ड्राइव्हमध्ये हा अपघात झाला. अपघातात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत्यू झालेला तरुण मुंबईतील हॉटेल व्यवसायिकाचा मुलगा आहे.

आर्यमन राजेश नागपाल आणि शौर्यसिंग शरद जैन हे दोघेही रात्री चौपाटीच्या दिशेने चालले होते. यावेळी उड्डाणपुलापासून १०० मीटर अंतरावर कार बसवर जाऊन आदळली. अपघातात आर्यमन आणि शौर्यसिंग दोघेही गंभीर झाले होते. दोघांनाही हरिकिशनदास रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण आर्यमन याला मृत घोषित करण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आर्यमन राजेश नागपाल याचे वडील मुंबईतील हॉटेल व्यवसायिक आहेत. प्रेसिडेंट हॉटेलचे ते मालक आहेत. दरम्यान शौर्यसिंग शरद जैन गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस याप्रकरणी सीसीटीव्ही तपासत असून कार नेमकं कोण चालवत होतं याची माहिती घेतली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 1:29 pm

Web Title: hoteliers teen son dies in car accident mumbai sgy 87
Next Stories
1 अभिनेता आमिर खानच्या असिस्टंटचं निधन
2 बेहरामपाडा रिकामा होणार?
3 Coronavirus : नव्या धोरणामुळे रुग्ण वाऱ्यावर
Just Now!
X