24 February 2021

News Flash

हॉटेल, पब, क्लबवर करडी नजर

मुंबईतील वांद्रे आणि परळ परिसरातील हॉटेलमध्ये रात्री उशिरा मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

मुखपट्टी, सुरक्षित अंतराचा नियम धुडकावणाऱ्यांवर कडक कारवाई

मुंबई : टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल केल्यानंतर मुंबईकर बेफिकीरपणे नियम धाब्यावर बसवू लागल्याचे परळमधील पबवर टाकलेल्या धाडीदरम्यान निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता सर्व हॉटेल, पब, रात्री उशिरापर्यंत चालणारे क्लब यांवर पथकांच्या माध्यमातून बारकाईने नजर ठेवण्यात येणार असून लवकरच त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार आहेत.

मुंबईतील वांद्रे आणि परळ परिसरातील हॉटेलमध्ये रात्री उशिरा मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे निदर्शनास आले आहे. तिथे सुरक्षित अंतराच्या नियमाचा फज्जा उडाला होता. अनेक जण मुखपट्टीविनाच होते. त्यामुळे पालिकेने मुखपट्टीविना वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. या प्रकरणी पालिकेने गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर पालिकेने मुंबईतील हॉटेल, पब, रात्री उशिरा सुरू असलेल्या क्लबवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.’

कारवाई कशी?

  •   पालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत.
  • एखाद्या ठिकाणी गर्दी जमल्याची तक्रार आल्यास तात्काळ पथके तेथे रवाना होतील आणि संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
  •    याबाबतचे सर्व अधिकार विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.
  •    याबाबत जारी करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होते की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पथके स्थापन करण्यात येणार असून आरोग्य अधिकारी, अग्निशमन दल आणि सुरक्षारक्षक दलातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा त्यात समावेश करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 12:16 am

Web Title: hotels pubs clubs strict action against those who break rules akp 94
Next Stories
1 दोन राजांमधील भांडणात प्रजेला भरडण्याचा प्रकार
2 चुकीच्या प्रवेशप्रक्रियेवर न्यायालयाची नाराजी
3 राज्यपालांकडून नावांची घोषणा होण्याआधीच विरोध करणे चुकीचे
Just Now!
X