News Flash

घरफोडी करणाऱ्या आरोपीस जम्मू-काश्मीरमधून अटक

कल्याण पूर्वेतील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी १४ लाखांची घरफोडी करणाऱ्या गणेश जोगिंदर प्रसाद या आरोपीला कोळसेवाडी पोलिसांनी

| November 15, 2013 05:02 am

कल्याण पूर्वेतील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी १४ लाखांची घरफोडी करणाऱ्या गणेश जोगिंदर प्रसाद या आरोपीला कोळसेवाडी पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधून अटक केली. त्याच्याकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे.
तिसगावमधील अयोध्यानगरीत राहणाऱ्या कैलास गायकवाड यांच्या घरी गेल्या महिन्यात चोरी झाली होती. चोरटय़ाने गॅलरीतून घरात प्रवेश करून रोख रक्कम व सोने असा १४ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. चोरी झाल्याच्या दिवशी कैलास यांचा व्यावसायिक मित्र गणेश प्रसाद याने त्यांना भ्रमणध्वनी करून कोठे आहात अशी विचारणा केली होती. पोलिसांनी गणेशच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. गणेश काश्मीरमध्ये बहिणीकडे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला तेथून ऐवजासह अटक केली, असे साहाय्यक पोलीस आयुक्त बी. एस. मोरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 5:02 am

Web Title: house burglar arrested from jammu kashmir
Next Stories
1 ५५ लाखांची फसवणूक
2 एचआयव्ही रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण
3 एक लेखक, तीन पुस्तके अन् २० लाख प्रतींची विक्री!
Just Now!
X