News Flash

SRA प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी घरं विकता येणार!

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

संग्रहीत

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज (शुक्रवार) पत्रकारपरिषदेत ‘एसआरए’मधील घरांबाबत महत्वाची माहिती दिली. एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी घरं विकता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच, सध्या इमारत बांधल्यानंतर पाच वर्षांपर्यंत घर विकता येत नाही. अनेक प्रकल्प पूर्ण व्हायला पाच ते १० वर्षांचा कालवधी लागतो, म्हणून झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी एसआरएतील घर विकण्याचा निर्णय लवकरच होणार असल्याचीही माहिती आव्हाड यांनी दिली.

यावेळी आव्हाड म्हणाले, यावेळी आव्हाड म्हणाले, इमारत बांधल्यानंतरचा जो पाच वर्षांचा नियम आहे, तो नियम बदलून त्याची झोपडी पडल्यानंतर त्याला तो पाच वर्षानंतर विकता आलं पाहिजे. कोणतीही एसआरएची योजना ही १०- १५ वर्षांच्या अगोदर तयार होत नाही. त्यामुळे त्याला घर मिळायला १५ वर्षे लागतात आणि नंतर विकायला ५ वर्ष.

याच महिन्यात बीडीडी पुनर्विकासाचा शुभारंभ –
सगळ्या बीबीडी चाळीचं भूमिपूजन या महिन्यात मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बीडीडी चाळीच्या बांधकामाला सुरूवात होईल. वरळी येथे आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील जो बीडीडीचा पट्टा आहे, तिथे उद्घाटन कार्यक्रम असेल. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत, २०१६ मध्ये झालेल्या या निर्णयाला आता वेग येईल. पुढील तीन ते चार वर्षांत बीडीडी उभी राहील.

तसेच, एसआरएमधील विकलेल्या घरांबाबत नोटीस पाठवली असुन, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी समिती देखील नेमण्यात आली आहे. इमारत बांधल्यानंतर पाच वर्षात घर विकता येत नाही, त्याच्या ऐवजी झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी घर विकता येणार असा नियम बनवण्यासाठी आम्ही विचार करत आहोत. याबाबत समितीचा लवकरच निर्णय होऊ शकतो. या समिमतीमध्ये अनिल परब, नवाब मलिक, वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांचा समावेश आहे. अशी माहिती देखील यावेळी आव्हाड यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 3:01 pm

Web Title: houses can be sold five years after demolition of sra project hut awhad msr 87
Next Stories
1 सचिन वाझे यांची कारकीर्द वादग्रस्तच!
2 बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
3 मुंबईत अंशत: टाळेबंदीचे महापौरांकडून संकेत
Just Now!
X