News Flash

परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले, मुंबईत बारावीच्या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा

सांताक्रूझमधील कनिष्ठ महाविद्यालय बारावीचे परीक्षा केंद्र असून वाकोला येथील रात्र महाविद्यालयातील विद्यार्थी या परीक्षा केंद्रात आला होता.

प्रतिकात्मक छायाचित्र

बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी मुंबईत इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढल्याची घटना समोर आली आहे. परीक्षा सुरु झाल्यावर विद्यार्थ्याने हे फोटो काढले असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन असल्याने विद्यार्थ्याला अटक करण्यात आलेली नसून त्याचा मोबाईल मात्र जप्त करण्यात आला आहे.

सांताक्रूझमधील कनिष्ठ महाविद्यालय बारावीचे परीक्षा केंद्र असून वाकोला येथील रात्र महाविद्यालयातील विद्यार्थी या परीक्षा केंद्रात आला होता. गुरुवारी पहिलाच पेपर इंग्रजीचा होता. सकाळी 11 वाजता परीक्षा सुरु झाली. साडे अकराच्या सुमारास पर्यवेक्षकाला एक विद्यार्थी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचे मोबाईलवर फोटो काढत असल्याचे लक्षात आले आणि हा प्रकार उघड झाला. हे फोटो तो कोणाला पाठवणार होता, हे अजूनही समजू शकलेले नाही. विद्यार्थ्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. त्याचा हेतू काय होता, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. बारावीची परीक्षा सुरु आहे आणि आरोपी हा अल्पवयीन असल्याने तुर्तास त्याला अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली.

विद्यार्थी परीक्षा केंद्रात मोबाईल घेऊन कसा काय पोहोचला, याचा देखील तपास केला जाणार आहे. बारावी आणि दहावीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोबाईल, टॅब घेऊन जाण्यास बंदी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 9:32 am

Web Title: hsc exam 2019 student clicked photo of english paper during exam booked santacruz
Next Stories
1 चंदा कोचर यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस, देश सोडून जाण्यास मनाई
2 मुंबईच्या लाइफलाइनवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, सर्व स्थानकांवर हाय अलर्ट
3 दशकभरात अवघे १२ प्रबंधच ‘शोधगंगा’वर
Just Now!
X