04 March 2021

News Flash

पर्यावरण ऱ्हासास मानवाचा हस्तक्षेप कारणीभूत

जागतिक स्तरावर तापमान वाढीचे संकट वाढीस लागण्यासाठी मानवाचा हस्तक्षेप कारणीभूत आहे.

‘पर्यावरण दिना’निमित्त ‘यशवंतराव प्रतिष्ठान’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

जागतिक पर्यावरण दिन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

जागतिक स्तरावर तापमान वाढीचे संकट वाढीस लागण्यासाठी मानवाचा हस्तक्षेप कारणीभूत आहे. परिणामत: पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मानवनिर्मित नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असल्यामुळे प्रदुषण नियंत्रण ठेवण्यासाठी जल-जमीन आणि जंगल या तिन्ही घटकांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिपादन केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण दिन सोहळ्याचा समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अनबलगल, मुंबई दूरदर्शनचे निर्माते शिवाजी फुलसुंदर आदी उपस्थित होते. जल, जमीन आणि जंगल या गोष्टींचे संवर्धन केले नाही तर त्याचा परिणाम थेट जीवसृष्टीवर होत असतो. त्याचबरोबर जल स्त्रोतांच्या प्रदुषणाचे एकत्रित नियोजन करून जल प्रदुषणमुक्त करणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर वाढलेल्या कार्बन फुट प्रिंटचे प्रमाण कमी केले तरी पर्यावरणाचे संवर्धन केल्याचा मोठा आनंद आपल्याला मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

महानगरातील सांडपाणी थेट नद्यांमध्ये, समुद्रात सोडण्यावर पर्यावरण विभागाने र्निबध आणले असून महानगरपालिका आणि नगरपालिका यांना अर्थसंकल्पात २५ टक्के निधी हा सांडपाणी आणि कचऱ्याचे व्यवस्थापन यावर खर्च करण्याता निर्णय घेतला आहे असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 2:21 am

Web Title: human is responsible for environmental loss
Next Stories
1 मुंबई मेट्रो वनला ‘टर्मिनल-२’चा लाभ
2 नवउद्य‘मी’ : ‘ती’ स्वयंसिद्ध होण्यासाठी
3 सहज सफर : चल, आंब्याच्या वनात जाऊ!
Just Now!
X