शहरातील गोळीबार भागातील वस्त्या भुईसपाट करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांचे उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच होते. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही भ्रष्टाचाराने बोकाळलेली असून विकासकांच्या अत्याचारांना तोंड देण्याची वेळ लोकांवर आल्याचे पाटकर यांनी म्हटले होते.
मुंबईतील सहा झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबबावे, अशी मागणी पाटकर यांनी केली आहे.
हे प्रकरण तडीला लावण्यासाठी मेधा पाटकर यांनी बेमुदत उपोषण केले आहे.