30 September 2020

News Flash

पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर मृतदेह घरातच जाळण्याचा प्रयत्न, पती फरार

धारावीतील डायमंड बिल्डिंगमध्ये रियाज हुसेन, त्याची पत्नी तेहसिन झोरा, मुलगी आलिया उर्फ फातिमा हे तिघे राहत होते.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईतील धारावी परिसरात पतीने पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रियाज हुसेन असे या आरोपीचे नाव असून घरातून धूर आल्याने शेजारच्यांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

धारावीतील डायमंड बिल्डिंगमध्ये रियाज हुसेन, त्याची पत्नी तेहसिन झोरा, मुलगी आलिया उर्फ फातिमा हे तिघे राहत होते. गुरुवारी सकाळी रियाजने आधी पत्नी तेहसिनची आणि मग तीन वर्षांच्या फातिमाची गळा चिरुन हत्या केली. यानंतर त्याने दोघांचे मृतदेह जाळले. मात्र, घरातून धूर येत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 5:39 pm

Web Title: husband kills wife 3 year old daughter in dharavi burn their body in house
Next Stories
1 फेरीवाल्यांकडे प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास परवाना तत्काळ रद्द
2 महामार्गावर वेग मर्यादेचे उल्लंघन; १२०० रुपये दंड, परवाना रद्दची अंमलबजावणी सुरु
3 Mumbai Metro 3 : माहीम ते शिवसेना भवन पर्यंतचे भुयारीकरण पूर्ण
Just Now!
X