News Flash

पत्नीला बदनाम करण्यासाठी पतीने षड्यंत्र रचले

आपल्याला बदनाम करण्यासाठी पतीनेच अश्लिल चित्रफित बनविण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.

| March 27, 2014 05:29 am

आपल्याला बदनाम करण्यासाठी पतीनेच अश्लिल चित्रफित बनविण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. जुहू पोलिसांनी याप्रकरणी या महिलेच्या पतीसह तिघांविरोघात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
या महिलेने पती छळ करत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. वांद्रे येथील सनिल त्रिवेदी या तरुणाने या महिलेशी व्हॉटस अ‍ॅपवर मैत्री केली. नोव्हेंबर २०१३ मध्ये विलेपार्ले येथील सन अ‍ॅण्ड सॅण्ड हॉटेलमध्ये नेऊन या महिलेशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. या काळात तिच्या नकळत तिची अश्लिल चित्रफितही तयार करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला. दरम्यान, या महिलेच्या पतीने पत्नीचे सनिल त्रिवेदी सोबत असलेली छायाचित्रे न्यायालयात सादर केली. मात्र पतीनेच हे षडयंत्र रचल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 5:29 am

Web Title: husband planned to defame wife
टॅग : Husband
Next Stories
1 पूजेच्या नावाखाली महिलेची फसवणूक
2 प्रवासी आरक्षण केंद्रातील आगीत दोन जवान जखमी
3 मुंबई महानगरपालिकेची ७०० कोटींचा कामे अपूर्ण
Just Now!
X