05 March 2021

News Flash

धक्कादायक! नवऱ्याने आणि त्याच्या मित्राने पत्नीवर केला बलात्कार

कल्याणमध्ये माणुसकीला लाजवणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने नवरा आणि त्याच्या मित्रा विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. १७ ऑगस्टला नवऱ्याने त्याच्या मित्राला घरी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कल्याणमध्ये माणुसकीला लाजवणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने नवरा आणि त्याच्या मित्रा विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. नवऱ्याने आणि त्याच्या मित्राने मिळून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार नोंदवली आहे. १७ ऑगस्टला नवऱ्याने त्याच्या मित्राला घरी बोलावले होते. त्यांनी गुंगीचे औषध मिसळून मला ज्यूस पाजला.

गुंगीच्या औषधामुळे माझ्या डोळयावर झापड असताना नवऱ्याने मला त्याच्या मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. पण मी त्याला नकार दिला. त्यावेळी नवऱ्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांनी माझ्यावर बलात्कार केला. मला ब्लॅकमेल करण्यासाठी नवऱ्याने त्या प्रसंगाचा व्हिडिओ सुद्धा बनवला असे पीडित महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे.

जेव्हा पीडित महिला पूर्ण शुद्धीत आली तेव्हा तिने आपण पोलिसांकडे जात असल्याचे सांगितले. त्यावेळी नवऱ्याने व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच लहान भावाला संपवण्याची धमकी दिली. त्यामुळे ती महिला शांत राहिली. रविवारी जेव्हा ही महिला रक्षा बंधनसाठी माहेरी गेली होती. तेव्हा तिने तिच्या बहिणीला सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबियांच्या सल्ल्यावरुन तिने दोन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार, विनयभंग आणि अन्य कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार आहेत. हे जोडपे अलीकडेच पनवेलहून कल्याणला रहायला आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 7:07 am

Web Title: husbund his friend rapes wife in kalyan
Next Stories
1 मतदारांची छायाचित्रे गहाळ!
2 प्रवाशांना स्वयंशिस्तीचा असाही फटका!
3 मुंबई-नाशिकची वाट खडतर!
Just Now!
X