19 January 2021

News Flash

नवऱ्यानेच बायकोवर बलात्कार करुन तिची हत्या केली, पत्नीवर प्रेमसंबंधांचा होता संशय

पतीनेच पत्नीवर बलात्कार करुन तिची हत्या केली. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी संतोष शेळकेला (४५) अटक केली

प्रातिनिधिक छायाचित्र

पतीनेच पत्नीवर बलात्कार करुन तिची हत्या केली. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी संतोष शेळकेला (४५) अटक केली आहे. सुनिता (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संतोष शेळके बरोजगार होता व त्याला मद्यपानाची सवय होती. पत्नी सुनिता मिलमध्ये नोकरीला होती. सुनिताचे कामावर परपुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संतोषच्या मनात संशय होता.

शहापूर तालुक्यातील बिरवाडी गावामध्ये हे जोडपे राहायचे. सुनिता बराचवेळ फोनवर बोलत राहायची. त्यामुळे तिचे बाहेर प्रेमप्रकरण सुरु असल्याचा संतोषला संशय होता. त्यावरुन त्यांचे बऱ्याचवेळा भांडणही झाले होते. सोमवारी रात्री सुनिता कामावरुन घरी परतल्यानंतर संतोष तिला निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला व नंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.

हा बलात्कार दुसऱ्याच कोणीतरी केला आहे असे वाटावे यासाठी संतोषने जवळ पडलेली बियरची बाटली उचलली व मृत शरीरावर घाव घातले. हत्या केल्यानंतर संतोष त्याच्या घरी गेला. त्यानंतर त्याने रात्र होऊनही पत्नी घरी परतलेली नाही त्यामुळे आपण चिंतेत असल्याचे चित्र शेजाऱ्यांसमोर निर्माण केले. स्थानिकांनी सुनिताचा शोध सुरु केल्यानंतर एका नाल्याजवळ त्यांना तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केल्यानंतर संतोष चौकशीमध्ये बराच रस दाखवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावला. जेव्हा पोलिसी खाक्या दाखवून त्याची कसून चौकशी सुरु केली तेव्हा त्याच्या कुठल्याच विधानाचा संदर्भ लागत नव्हता अखेर पोलिसांसमोर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 2:31 pm

Web Title: husbund rapes and kills wife
टॅग Thane
Next Stories
1 निसर्गाच्या कुशीत ठाणेकरांचे आरोग्य धडे!
2 वालधुनीच्या पात्रात विषाचा पूर
3 औद्योगिक जमिनीवर मैदानाचे आरक्षण
Just Now!
X