17 December 2017

News Flash

बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक असल्याने लतादीदी अस्वस्थ

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती चिंताजनक असल्याने मी फार अस्वस्थ झाले आहे, ते माझ्या कुटुंबापैकीच

मुंबई | Updated: November 15, 2012 1:25 AM

बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मी फार अस्वस्थ झाले आहे, ते माझ्या कुटुंबापैकीच एक आहेत, अशी प्रतिक्रिया गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विटरवर नोंदवली आहे. बाळासाहेबांच्या प्रकृतीचा विचार करता मी माझ्या म्युझिक कंपनीचे उद्घाटन पुढे ढकलत आहे. बाळासाहेब आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना माझ्या सदिच्छा आहेत, असंही त्यांनी पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. नुकतीच त्यांनी बाळासाहेबांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती घेतली होती. बाळासाहेब लवकर बरे व्हावेत यासाठी लतादीदी प्रार्थना करत आहेत. 

First Published on November 15, 2012 1:25 am

Web Title: i am extremely disturbed lata mangeshkar
टॅग Lata Mangeshkar