29 September 2020

News Flash

राजीनामा दिलेला नाही; ‘हितचिंतकां’कडून अफवा पसरवणे सुरू : सत्तार

उद्या सायंकाळी पुन्हा मातोश्रीवर जाणार; मुख्यमंत्र्यांना सर्वकाही माहिती दिल्याचेही सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

महाविकासआघाडी सरकारमधील राज्यमंत्री शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्यांनी काल दिवस गाजवल्यानंतर आज आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबईत मातोश्रीवर येथे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या पार्श्वभूमीवर भेट घेतली.

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झाल्या प्रकाराबाबतची संपूर्ण माहिती दिली. तसेच, माझ्या राजीनाम्याची पुडी कोणी सोडली व कुठून सोडली याबद्दल देखील माहिती दिली आहे. मी राजीनामा दिला नाही, राजीनामा द्यायचा असेल तर तो मुख्यमंत्र्यांकडे सोपवावा लागत असतो, परंतु ही जी सर्व अफवा पसरवण्याचे काम आमचे जे हितचिंतक करत आहेत, त्यांच्याबाबत चौकशी करून याबाबत शहानिशा केली जाईल. उद्या सायंकाळी पाच वाजता मी पुन्हा मातोश्रीवर येणार आहे. अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना दिली आहे.

… तर कालची दुर्देवी घटना घडली नसती –
जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा कोणीही फुटला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांचे इष्टमित्र परिवारातील काहीजण फुटलेले आहेत. परंतु, त्यांच्याबरोबर जर समन्वय साधला गेला असता व त्यांना सन्मानाने बोलावलं असतं तर काल जी दुर्देवी घटना घडली ती कदाचित घडली नसती. सर्व निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात बोलतील, असं देखील सत्तार यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 2:00 pm

Web Title: i havent resigned sattar msr 87
Next Stories
1 रुळाला तडा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
2 मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेला दिलासा
3 वादग्रस्त आदर्श इमारतीची उभारणी अनधिकृतच!
Just Now!
X