28 September 2020

News Flash

तुम्ही आता सोबत आहात, मला ठाऊक आहे; पूनम महाजन यांचे भावस्पर्शी ट्विट

सोशल मीडियावर पूनम महाजन यांनी वाहिलेली ही आदरांजली खूप बोलकी आहे हेच या फोटोतून दिसून येते.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी निधन झाले, त्यानंतर शुक्रवारी म्हणजेच काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळ या ठिकाणी अटलजींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशातल्या या महान नेत्याला निरोप देताना सगळेच हळहळले. सोशल मीडियाही त्याला अपवाद नाही. सोशल मीडियावर प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि भाजपा नेत्या पूनम महाजन यांनी एक फोटो ट्विट करत अटलजींना आदरांजली वाहिली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.

या फोटोची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. तसेच हजारो नेटकऱ्यांनी हा फोटो रिट्विट केला. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि अटलजी दिलखुलासपणे हसत आहेत असा फोटो ट्विट करून पूनम महाजन यांनी एका ओळीचे ट्विट केले I know you are together now. (मला ठाऊक आहे तुम्ही आता सोबत आहात) या फोटोची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती.

अटलजींच्या काळात प्रमोद महाजन केंद्रीय मंत्री होते. प्रमोद महाजन आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यातले नाते देश जाणतो, गुरू आणि शिष्य असे नाते या दोघांमध्ये होते. तसेच प्रमोद महाजन हे अटलजींना त्यांचा आदर्श मानत. त्यांच्या भाषणांचा प्रभाव प्रमोदजींवर होता. २००६ मध्ये प्रमोद महाजन यांची त्यांच्या भावाने गोळ्या झाडून हत्या केली. ज्यानंतर देशाने एक महान नेता गमावला. आता अटल बिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन यांचा फोटो ट्विट करत पूनम महाजन यांनी या सगळ्या आठवणी जाग्या केल्या. सोशल मीडियावर त्यांनी वाहिलेली ही आदरांजली खूप बोलकी आहे हेच यातून दिसून येते.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 7:33 am

Web Title: i know you are together now poonam mahajan tweets pramod mahajan and atal bihari vajpayees photo
Next Stories
1 गुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकमध्ये भीषण धडक; ५ जण जागीच ठार
2 मनमोहन सिंग सरकारच्या काळात भारताने राखला १०.०८ टक्के विकास दर
3 वाजपेयी असामान्य मुत्सद्दी नेते : पुतिन
Just Now!
X