एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी २३ सप्टेंबरला गणपती बाप्पा मोरया म्हणत गणपती तुम्हा सगळ्यांची दुःखं दूर करो असे म्हटले होते. मात्र त्यांच्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागत यापुढे आपण कधीही गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही माझी चूक झाली असे म्हणत समस्त मुस्लिम बांधवांची माफी मागितली आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांनी यासंदर्भातला व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ते यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही असे म्हणत आहेत. ही माफी मागण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला अशीही चर्चा रंगते आहे. ज्यानंतर त्यांनी आपला माफीनामा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. वारीस पठाण गणपती बाप्पा मोरया म्हणाले म्हणून त्यांच्यावर पक्षाने मोठ्या प्रमाणावर टीका केली. ज्यानंतर त्यांनी आपण चुकलो असे म्हणत माफी मागितली आहे.

आपल्या माफीमध्ये त्यांनी कलमा म्हणत सगळ्यांना सलाम केला आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या तोंडून अशी काही वाक्ये निघून गेली त्याबद्दल मी अल्लाहची माफी मागितली आहे. मी पण एक माणूस आहे माझ्याकडून चूक झाली आहे. यापुढे पुन्हा कधीही असे घडणार नाही असेही आश्वासन त्यांनी दिले आहे. प्रत्येक माणसाकडून चुका होतात, तशीही माझीही चूक झाली. अल्लाह मला माफ करेल यात मला काहीही शंका वाटत नाही. तसेच सगळ्या मुस्लिम बांधवांची माफी मागत आणि सगळ्यांनी माझ्यासाठी दुवा करावी अशी विनंती केली आहे.

काय आहे माफीनामा?

वारीस पठाण यांच्या या माफीवर शिवसेनेने टीका केली आहे. वारीस पठाण हे गणपती बाप्पा मोरया म्हणाले तर त्यात काय बिघडले? त्यांनी काही गुन्हा केला आहे का? त्यांनी गणपती बाप्पा मोरया म्हणण्यासाठी माफी का मागितली? आजही अनेक हिंदू असे आहेत जे मशिदीत जातात, अजमेरला जातात. मग त्यामुळे काय त्यांचा धर्म बदलतो का? असा प्रश्न शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी विचारला आहे आणि त्यांच्या माफीचा निषेध नोंदवला आहे.

काय म्हटले होते वारीस पठाण?