14 December 2017

News Flash

लिओपोल्ड कॅफेवर प्राप्तिकर खात्याचा छापा

सोमवारी संध्याकाळी प्राप्तिकर खात्याने मुंबईतील कुलाबा परिसरातील प्रसिध्द लिओपोल्ड कॅफेवर छापा मारला. प्राप्तिकर खात्याच्या

मुंबई | Updated: February 19, 2013 12:47 PM

सोमवारी संध्याकाळी प्राप्तिकर खात्याने मुंबईतील कुलाबा परिसरातील प्रसिध्द लिओपोल्ड कॅफेवर छापा मारला. प्राप्तिकर खात्याच्या अधिका-यांनी संध्याकाळी सहा वाजता सुरू केलेली चौकशी रात्री उशीरपर्यंत सुरू होती.
अधिका-यांच्या म्हणण्याप्रमाणे कॅफेच्या काही विभागाच्या कागदपत्रांमध्ये सुसूत्रता न आढळल्याने ती ताब्यात घेण्यात आली आहेत.
२००८ साली मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात लिओपोल्ड कॅफेमध्येही गोळीबार झाला होता. अनेक वर्षांपासून परदेशी पर्यटकांसाठी हे कॅफे आकर्षणाचा विषय राहिले आहे.

First Published on February 19, 2013 12:47 pm

Web Title: i t department conducts overnight raids at leopold cafe