शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना रणौतचा उल्लेख नॉटी गर्ल असा केला होता. याबाबत कंगनाला आज प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता तूर्तास आपण यावर काहीही भाष्य करणार नाही असं उत्तर दिलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना खासदार यांनी कंगनाचा उल्लेख नॉटी गर्ल असा केला. एवढंच नाही तर हरामखोर या शब्दाचा अर्थही त्यांनी उलगडून सांगितला होता हरामखोर म्हणजे बेईमान या अर्थाने महाराष्ट्रात बोललं जातं. कंगना नॉटी गर्ल आहे आणि बेईमान आहे या अर्थाने मी तो उल्लेख केला. ती महाराष्ट्राबाबत आणि मुंबईबाबत जे काही बोलली तसंच कोलकाता, अहमदाबाद या शहरांबाबत बोलली असती तर तिला तिथल्या लोकांनीही असंच काहीसं म्हटलं असतं. हरामखोर या शब्दावरुन राजकारण करण्याची गरज नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
आणखी वाचा- संजय राऊतांच्या नॉटी, हरामखोर शब्दांवरून पेटलेला वाद आहे तरी काय?
#WATCH I won’t say anything on it right now: Kangana Ranaut on being asked about Shiv Sena leader Sanjay Raut’s comments against her pic.twitter.com/Ei49V065Pz
— ANI (@ANI) September 8, 2020
आता संजय राऊत यांनी जो कंगनाचा उल्लेख नॉटी गर्ल असा केला त्यावरुन तिला विचारलं असता सध्या मी यावर काहीही भाष्य करणार नाही अशी एका ओळीची प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे. कंगनाने मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसाखी वाटते असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर तिच्यावर कलाक्षेत्रातून आणि राजकीय क्षेत्रातून टीकेची झोड होती. एवढंच नाही तर संजय राऊत आणि कंगना यांच्यात आरोपांच्या फैरीही झडल्या. काल एका मुलाखती दरम्यान संजय राऊत हे तिला नॉटी गर्ल असं म्हणाले. याबाबत कंगनाला प्रतिक्रिया विचारली असता तूर्तास आपण काहीही बोलणार नाही असं तिने म्हटलं आहे.
आणखी वाचा- “सोनिया म्हणजे नवमातोश्री, राऊत म्हणजे नॉटी बॉय”
हरामखोर बाबत काय म्हणाले संजय राऊत?
एखाद्या विषयाचं राजकारण करायचं असेल तर कुठल्याही शब्दाचा कुठलाही अर्थ निघू शकतो. महाराष्ट्रात आम्ही जेव्हा हरामखोर असं म्हणतो तेव्हा आम्ही त्याचा अर्थ खट्याळ आणि बेईमान असा होता. जी व्यक्त मुंबईत राहतो त्याबद्दल कुणी काही बोललं तर लोक असं म्हणतात त्याचा फार वेगळा अर्थ काढायची गरज नाही. जर कंगना रणौत कोलकाता, अहमदाबाद किंवा इतर कोणत्याही शहराबाबत असं बोलली असती तर त्या शहरांमधले लोक त्यांच्या भाषेत कंगनाला बोललेच असते तसंच मी बोललो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2020 3:08 pm