News Flash

ICAI CA Result 2018 : सिद्धांत भंडारी, शादाब हुसैन देशात प्रथम

फाऊंडेशन परीक्षेत जळगावच्या सौम्या जाजू हिने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नव्या अभ्यासक्रमात सिद्धांत भंडारी, जुन्या अभ्यासक्रमात शादाब हुसैन प्रथम

मुंबई : सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी जाहीर झाला असून नव्या अभ्यासक्रमानुसार १ हजार ६० तर जुन्या अभ्यासक्रमानुसार १३ हजार ९०९ विद्यार्थी सनद देण्याची आली आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार जोधपूर येथील सिद्धांत भंडारी हा आणि जुन्या अभ्यासक्रमानुसार कोटा येथील शादाब हुसैन यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर फाऊंडेशन आणि पूर्वपरीक्षेचा (सीपीटी) निकाल जाहीर झाला असून फाऊंडेशन परीक्षेत जळगावच्या सौम्या जाजू हिने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’च्या वतीने नोव्हेंबर २०१८ मध्ये जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षा आणि फाऊंडेशन परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्याचप्रमाणे डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेचा (सीपीटी) निकालही जाहीर झाला. नव्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत जोधपूर येथील सिद्धांत भंडारी हा ८०० पैकी ५५५ गुण मिळवून देशात प्रथम आला. रायपूर येथील रोहित सोनी (५४४ गुण) हा दुसरा तर अहमदाबाद येथील पुलकीत अरोरा आणि कोलकता येथील जय बोहरा (५४२ गुण) यांनी तिसरे स्थान पटकावले आहे.

जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत कोटा येथील शादाब हुसैन (५९७ गुण) हा प्रथम आला आहे. गुजरात येथील शाहीद मेमन (५८४ गुण) दुसरा तर बंगाल येथील रिषभ शर्मा (५७५ गुण) तिसरा आला आहे. फाऊंडेशन परीक्षेत देवास येथील गर्वित जैन (४०० पैकी ३७४ गुण) हा प्रथम तर फरिदाबाद येथील क्षितीज मित्तल (३७० गुण) हा दुसरा आला आहे. जळगाव येथील सौम्या जाजूसह छत्तीसगढ येथील हार्दिक गांधी, तामिळनाडू येथील मृत्यूंजय रविचंद्रन (३६८) गुण यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.

दृष्टिक्षेपात निकाल

* नव्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेसाठी पहिल्या विषय गटाच्या (ग्रुप १) परीक्षेला ६ हजार १८१ विद्यार्थी बसले होते त्यातील ८८४  विद्यार्थी (१४.३० टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.

*  दुसऱ्या विषय गटाच्या (ग्रुप २) परीक्षेला ३ हजार ३०७ विद्यार्थी बसले असून त्यातील ८९४ विद्यार्थी (२७.०३ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही विषय गटांची परीक्षा ४ हजार ७५ विद्यार्थ्यांनी दिली असून  त्यातील ६७० (१६.४४ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

*  जुन्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या विषय गटाची (ग्रुप १) परीक्षा ३२ हजार ६३३ विद्यर्थी बसले होते त्यातील ९ हजार ९३४ विद्यर्थी (३०.४४ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.  दुसऱ्या विषय गटाची (ग्रुप २) परीक्षा ३५ हजार ६५५ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यातील ८ हजार ३४८ विद्यार्थी (२३.४१ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही विषय गटांची परीक्षा २२ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी दिली असून  त्यातील ३ हजार ३८३ (१५.०३ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

*  फाऊंडेशन परीक्षा ४८ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यातील २१ हजार ४८८ (४४.१२ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा (सीपीटी) आणि फाऊंडेशन परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला. देशभरातील २५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी सीपीटी दिली. त्यातील ९ हजार ३८ (३६.१० टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 9:11 pm

Web Title: icai ca result 2018 ca final and ca foundation nov 2018 results declared
Next Stories
1 कुंभमेळ्यात अन्नपदार्थ, पाण्यामध्ये रसायन मिसळून हल्ला करण्याचा कट एटीएसने उधळला
2 मंत्रालय पत्रकारांना विशिष्ट गृहनिर्माण प्रकल्पात 50 टक्के आरक्षण
3 मुंबई : नामांकित बँकेच्या मॅनेजर तरुणीला लाखोंचा गंडा, दिल्लीतूल भामट्याला अटक
Just Now!
X